Join us
Daily Top 2Weekly Top 5

"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 14:39 IST

शिव लग्न कधी करणार? असा प्रश्न अनेकदा अभिनेत्याला विचारला जातो. ३५ वर्षांचा शिव अद्यापही सिंगल आहे. पण, लग्नाची भीती वाटत असल्याचं आता शिवने सांगितलं आहे.

शिव ठाकरे हा अनेक तरुणींचा क्रश आहे. त्याचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. शिव लग्न कधी करणार? असा प्रश्न अनेकदा अभिनेत्याला विचारला जातो. ३५ वर्षांचा शिव अद्यापही सिंगल आहे. त्याची नावं अनेक अभिनेत्रींसोबत जोडली गेली. डेटिंगच्या चर्चाही रंगल्या. पण, लग्नाची भीती वाटत असल्याचं आता शिवने सांगितलं आहे. 

शिवने 'फिल्मी ज्ञान'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत लग्नाच्या प्रश्नावर त्याने मेरठमध्ये घडलेल्या घटनेचा उल्लेख केला. शिव म्हणाला, "मला तर आता लग्नाची भीती वाटायला लागली आहे. हे मुलांचे कर्म आहेत. आता जे मुलांसोबत होत आहे. ते आपल्या पूर्वजांनी मुलींसोबत केलं आहे. लोकांना वाटत आहे की मुलांसोबत वाईट घडत आहे. कोणी ड्रममध्ये भरत आहे...पण हे मुलींबरोबर कित्येक वर्षांपासून घडत आहे. हा तर कर्मा आहे...". 

'बिग बॉस मराठी २'चा शिव विजेता होता. शिव आणि वीणा जगताप हे बिग बॉसच्या घरातच एकमेकांच्या जवळ आले होते. त्यांच्या रिलेशनशिपची प्रचंड चर्चा रंगली होती. मात्र नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर शिव ठाकरे डेजी शाहला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, या सगळ्या अफवा असल्याचं दोघांनीही म्हटलं होतं. 

टॅग्स :शीव ठाकरेबिग बॉसटिव्ही कलाकार