Join us
Daily Top 2Weekly Top 5

'लालबागचा राजा'ला पाहताच अभिनेत्याची आई भावुक, बाप्पाच्या दरबारातच डोळ्यातून आले अश्रू अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 15:07 IST

'लालबागचा राजा'ला पाहताच अभिनेत्याच्या आईचे डोळे पाणावले, बाप्पाच्या दरबारातच कोसळलं रडू

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे. गणरायाच्या आगमनाने वातावरणही प्रफुल्लित झाले आहे. मुंबईतील लालबाग नगरी गणरायाच्या जयघोषात दुमदुमून गेली आहे. प्रसिद्ध अशा लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक गर्दी करतात. तर अनेक सेलिब्रिटीही बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतात. अशाच एका अभिनेत्याने आईसोबत लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. पण, राजाला पाहताच अभिनेत्याची आई भावुक झाली. 

बिग बॉस फेम अभिनेता राजीव अदातियाने नुकतंच लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. त्याच्याबरोबर त्याची आई आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रादेखील होती. लालबागच्या राजाला पाहताच राजीवची आई भावुक झाली. राजाच्या दरबारात येताच राजीवच्या आईला अश्रू अनावर झाले. अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोंमध्येही त्याच्या आईचे डोळे पाणावलेले दिसत आहेत. राजीवने हे फोटो शेअर करत पोस्टही लिहिली आहे. 

लालबागचा राजाचं दर्शन घेतल्यानंतर अभिनेत्याची पोस्ट 

गणपती बाप्पा मोरया!!

मला आणि माझ्या कुटुंबीयांना ओळखणाऱ्या हे माहीत असेल की माझ्या आईचं गपणतीवर किती प्रेम आहे. त्याच्याबरोबर तिच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्याचं नाव ऐकलं तरी ती भावुक होते. मी तिला वचन दिलं होतं की एक दिवस मी तुला लालबागचा राजाचं दर्शन घडवून देईन. इतकी गर्दी पाहून मला काळजी वाटत होती. मी परिणीतीला सांगितलं आणि ती म्हणाली, "तुम्ही चिंता करू नका...त्याचं दर्शन घ्या. मी तुम्हाला घेऊन जाईन". 

माझी आई लहान मुलासारखी रडत होती. बाप्पाच्या पायाजवळ जाताच तिला जास्तच रडू आलं. परिणीती तू गॉड चाइल्ड आहेस. मला काळजी वाटत होती हे पाहून तू आईला हाताला धरुन तिच्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेऊ दिलंस. तू फक्त माझी मैत्रीण नाहीस तर कुटुंब आहेस. माझी आई एक सामान्य व्यक्ती आहे. पण, तिचं बाप्पासाठी असलेलं प्रेम म्हणजेच सर्वकाही आहे. 

राजीवच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. दरम्यान, राजीवने अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. खतरों के खिलाडी १२, बिग बॉस १५ मध्ये तो सहभागी झाला होता.  

टॅग्स :गणेशोत्सव 2024लालबागचा राजाटिव्ही कलाकार