'बिग बॉस १९'च्या फिनालेची उलटी गणती सुरू झाली आहे. शो आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या सीझनचे टॉप ५ फायनालिस्टही मिळाले आहेत. गौरव खन्ना, फरहाना भट्ट, अमाल मलिक, तान्या मित्तल आणि प्रणित मोरे यांचा त्यात समावेश आहे. या पाचपैकी आता फक्त एकच स्पर्धक ट्रॉफी जिंकणार आहे. यासोबतच टॉप ३ फायनालिस्ट कोण असू शकतात, याचेही अंदाज बांधणे सुरू झाले आहेत. तसेच, विजेत्याला मिळणारी प्राईज मनी किती असू शकते? याबद्दलही उत्सुकता वाढली आहे.
'बिग बॉस १९'च्या पर्वाची ट्रॉफीची झलकही चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. चमचमत्या ट्रॉफीची डिझाइन ही खूप हटके आहे. हात जोडल्याचं डिझाइन, त्याखाली "BB" असंही लिहिलेलं आहे. रविवार, ७ डिसेंबर रोजी सलमान खान होस्ट करणार असलेल्या या शोचा ग्रँड फिनाले होणार आहे.
'बिग बॉस'च्या चाहत्यांमध्ये नेहमीच विजेत्याला मिळणाऱ्या बक्षीस रकमेबद्दल उत्सुकता असते. शोच्या सुरुवातीच्या सीझनमध्ये ही रक्कम १ कोटी रुपये होती, परंतु आता ती कमी झाली आहे. सीझन १८ च्या विजेत्याला मिळालेल्या रकमेनुसार, सीझन १९ च्या विजेत्याला ५० लाख रुपयांच्या बक्षीस रकमेसह ट्रॉफी मिळण्याची अपेक्षा आहे.
ट्रॉफीचा प्रबळ दावेदार कोण?या शोचा विजेता प्रेक्षकांच्या मतदानाने निश्चित होतो आणि सर्वाधिक मते मिळवणारा स्पर्धक सीझनचा विजेता घोषित होतो. सध्या सोशल मीडियावर गौरव खन्ना, तान्या मित्तल, अमाल मलिक आणि प्रणित मोरे हे बिग बॉस १९ ची ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. आता अंतिम विजेता कोण ठरणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Web Summary : Bigg Boss 19 finale nears! Top 5 finalists are: Gaurav Khanna, Farhana Bhatt, et al. Winner expected to receive ₹50 lakh and trophy. Voting determines the champion.
Web Summary : बिग बॉस 19 का फिनाले करीब! टॉप 5 फाइनलिस्ट: गौरव खन्ना, फरहाना भट्ट, आदि। विजेता को 50 लाख रुपये और ट्रॉफी मिलने की उम्मीद है। वोटिंग से चैंपियन का निर्धारण।