Join us

Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 12:33 IST

सलमान खान ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी वीकेंड का वार होस्ट करणार नाही.

'बिग बॉस १८' (Bigg Boss 18) च्या येत्या वीकेंड का वार मध्ये ट्विस्ट बघायला मिळणार आहे. या शनिवार-रविवार भाईजान सलमान खान दिसणार नाही. तर त्याच्या जागी दोन सेलिब्रिटी सदस्यांची शाळा घेण्यासाठी येणार आहेत. बिग बॉसचे चाहते सलमानच्या वीकेंड का वारची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र सध्या सलमानच्या आयुष्यात बरंच काही सुरु आहे. त्यातच तो सिनेमाचं शूट आणि दबंग टूरमध्येही व्यस्त असणार आहे. अशातच या 'वीकेंड का वार'ला तो अनुपस्थित राहणार आहे.

ईटाइम्स च्या रिपोर्टनुसार, सलमान खान ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी वीकेंड का वार होस्ट करणार नाही. कारण तो सध्या त्याच्या आगामी 'सिकंदर' सिनेमाच्या शूटमध्ये व्यस्त आहे. याचं शूट हैदराबादमध्ये सुरु आहे. सलमानचा हा बहुप्रतिक्षित सिनेमा पुढील वर्षी ३० मार्च रोजी ईदच्या मुहुर्तावर  प्रदर्शित होणार आहे. सिनेमात रश्मिका मंदाना आणि काजल अग्रवाल यांचीही भूमिका आहे.

सलमान खानच्या अनुपस्थितीत याआधी करण जोहर, फराह खानने शो होस्ट केला आहे. पण यावेळी एकता कपूर आणि रोहित शेट्टी वीकेंड का वार होस्ट करताना दिसणार आहेत. ८ आणि ९ नोव्हेंबरला हे एपिसोड टेलिकास्ट होणार आहेत. 

एकता कपूर सध्या आगामी 'द साबरमती रिपोर्ट' सिनेमाचं प्रमोशन करत आहे. तर रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' नुकताच रिलीज झाला आहे. 

टॅग्स :सलमान खानबिग बॉसटेलिव्हिजनएकता कपूररोहित शेट्टी