Join us

"सुशांतच्या डायरीत १२ दिग्दर्शकांची नावे होती, ज्यांच्यासोबत...", 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्याचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 12:08 IST

सुशांतने त्याला कठीण काळात मदत केल्याचंही अभिनेत्याने सांगितलं. शिवाय सुशांतकडे एक डायरी होती, असा खुलासाही त्याने यावेळी केला. 

Bigg Boss 18: 'बिग बॉस १८' हे पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. या पर्वात पत्रकार सौरभ द्विवेदी आले आहेत. सौरभ यांच्यासमोर घरातील सदस्यांची पोलखोल होत आहे. अशातच करण वीर मेहराने सौरभ यांच्याशी बोलताना दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. सुशांतने त्याला कठीण काळात मदत केल्याचंही अभिनेत्याने सांगितलं. शिवाय सुशांतकडे एक डायरी होती, असा खुलासाही त्याने यावेळी केला. 

करण वीरने एके काळी नशेच्या आहारी गेल्याचा खुलासा केला. यावेळी सुशांतने त्याला मदत केली होती असं त्याने सांगितलं. त्यामुळे जेव्हा सुशांतने आत्महत्या केल्याचं समजलं तेव्हा त्याला धक्का बसला होता. तो म्हणाला, "सुशांतने मला खूप मदत केली होती. माझ्या करिअरची तेव्हा वाईट वेळ सुरू होती. तो एक इंजिनीयर होता. त्यामुळे तो त्याचं म्हणणं अगदी स्पष्ट आणि योग्यरित्या तो समोरच्याला सांगायचा. त्याने पुढच्या ५ वर्षांत कुठे पोहोचायचं आहे. याचा विचार करून त्याच्या आयुष्याचंही प्लॅनिंग केलं होतं. त्याने त्याच्या ओळखीतील काही लोकांबरोबर भेटही घालून दिली होती".

"त्याला कधी मदतीची गरज होती असं तुला वाटलं का?" या प्रश्नाचं उत्तर देताना करणवीर म्हणाला, "नाही. मला असं कधीच वाटलं नाही. त्याच्या मृत्यूच्या बातमीने मला धक्का बसला होता. त्याच्याकडे एक डायरी होती. ज्यामध्ये त्याने १२ दिग्दर्शकांची नावं लिहिली होती. त्यापैकी त्याने ६-८ दिग्दर्शकांसोबत काम केलं होतं किंवा करणार होता. त्याच्या गोष्टींबाबत तो अगदी क्लिअर होता. तो माझ्या आईला खूप मानायचा. आम्ही एकत्र बसून जेवणही करायचो. त्यामुळे त्याच्या मृत्यूने माझ्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला होता". 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतबिग बॉसटिव्ही कलाकार