Join us

Bigg Boss 18 Grand Finale: आज ठरणार 'बिग बॉस १८'चा विजेता! कुठे पाहाल ग्रँड फिनाले? बक्षिसाची रक्कम किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 10:00 IST

आज 'बिग बॉस १८'चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. यंदा 'बिग बॉस'च्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

Bigg Boss 18 Grand Finale: 'बिग बॉस १८'चं पर्व आता अंतिम टप्प्यात आलं आहे. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेला आता अवघे काही तासच बाकी उरले आहेत. यंदा 'बिग बॉस'च्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. आज 'बिग बॉस १८'चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. 

कुठे पाहाल 'बिग बॉस १८'चा ग्रँड फिनाले?

सलमान खान होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस १८' चा महाअंतिम सोहळा आज होणार आहे. रात्री ९.३० वाजल्यापासून 'बिग बॉस १८'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात होणार आहे. कलर्स चॅनेलवर प्रेक्षकांना हा ग्रँड फिनाले पाहता येईल. त्याबरोबरच जिओ सिनेमावरही याचं लाइव्ह प्रेक्षपण केलं जाणार आहे. 

कोणाला मिळणार ट्रॉफी? 

'बिग बॉस १८'च्या ग्रँड फिनालेआधी मिड वीक एविक्शन झालं. यामध्ये श्रुतिका अर्जुन, चाहत पांडे व शिल्पा शिरोडकर यांना घराचा निरोप घ्यावा लागला.  करणवीर मेहरा, चुम दरांग, रजत दलाल, विवियन डिसेना, अविनाश मिश्रा व इशा सिंह हे 'बिग बॉस १८'चे टॉप ६ सदस्य आहेत. यापैकी आता 'बिग बॉस १८'च्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार, हे पाहावं लागेल. 

विजेत्याच्या बक्षिसाची रक्कम किती? 

'बिग बॉस १८'च्या विजेत्याला आकर्षक ट्रॉफी मिळणार आहे. त्याबरोबरच ५० लाख ही बक्षिसाची रक्कमही विजेत्याला मिळणार आहे. 

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार