Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस 17' ची ट्रॉफी जिंकणारा होईल मालामाल; ट्रॉफीसह मिळणार 'इतकी' रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 15:47 IST

बिग बॉसच्या घरातील कोणता स्पर्धक ट्रॉफीवर आपले नाव कोरणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या 'बिग बॉस' हिंदीच्या 17 व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा जवळ येत आहे. शोबद्दल सतत नवीन अपडेट्स येत राहतात. बिग बॉसच्या घरातील कोणता स्पर्धक ट्रॉफीवर आपले नाव कोरणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या सोबतच विजेत्याला किती मानधन मिळणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. 

नुकतेच पार पडलेला 'वीकेंड का वार' हा सलमान खानच्या जागी करण जोहरने होस्ट केला. यावेळी त्यांनी सर्व स्पर्धकांची शाळा घेतली. तसेच त्याने सर्व स्पर्धकांना एक आनंदाची बातमी देत विजेत्याला मिळणाऱ्या ट्रॉफी आणि बक्षीस रक्कमेचा खुलासा केला. 'बिग बॉस 17'च्या विजेता स्पर्धकासाठी यंदा बक्षिसाची रक्कम 50 लाख रुपये ठरवण्यात आली आहे. यासोबतच स्पर्धकाला आलिशान कारदेखील मिळणार आहे. त्यामुळे ट्रॉफी आपल्या नावे करण्यासाठी घरातील सर्व स्पर्धकांमध्ये चढाओढ होत असलेली पाहायला मिळत आहे.

 'बिग बॉस'च्या 17 व्या पर्वात 21 स्पर्धक सहभागी झाले. यातील अनेक स्पर्धकांनी वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे घरात प्रवेश केला. सोनिया, मनस्वी, जिग्ना व्होरा, सनी आर्या, रिंकू धवन, खानझादी, सना रईस खान, ऑरा, समर्थ जुरेल, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, अनुराग डोवाल आणि नवीद सोल हे बेघर झाले. आता विजेता होण्याच्या शर्यतीत एकूण 8 स्पर्धक राहिले आहेत. 

ज्यामध्ये अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, विकी जैन, अरुण महाशेट्टी, मन्रारा चोप्रा, आयशा खान आणि ईशा मालवीय यांच्या नावांचा समावेश आहे. यांच्यामध्ये तगडी लढाई असल्याचं दिसून येत आहे. येत्या काही दिवसांमध्ये यातून काही स्पर्धक बाहेर पडतील. तर, टॉप-5 स्पर्धकांमध्ये मुन्रवर फारुकीचे नाव आघाडीवर असून अंकिता लोखंडे दुसऱ्या स्थानावर आहे. आता बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडणार आणि बिग बॉसची ट्रॉफी कोण उंचावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

टॅग्स :सलमान खानसेलिब्रिटीटेलिव्हिजनबिग बॉसअंकिता लोखंडे