Join us
Daily Top 2Weekly Top 5

धमाकेदार असणार 'बिग बॉस 17'चा ग्रँड फिनाले; मनोरंजनाचा तडका देणार मोठे स्टार्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 16:09 IST

आता नुकताच एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

 'बिग बाॅस 17' च्या फिनालेला अवघे काही दिवस उरले आहेत. बिग बाॅसच्या घरात आता फक्त सहा स्पर्धेक उरले असून यापैकी एकजण बिग बाॅसचा विजेता होणार आहे.  'बिग बाॅस 17' च्या घरातील स्पर्धेकांनी प्रेक्षकांचे आतापर्यंत जबरदस्त मनोरंजन केले आहे. इतकेच नाही तर फिनाले विकमध्येही घरामध्ये मोठे वाद बघायला मिळाले. आता नुकताच एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये धमाकेदार असणार ग्रँड फिनाले पाहायला मिळत आहे. 

कलर्स चॅनलने आपल्या सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर  'बिग बाॅस 17' च्या फिनालेचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारती सिंग, हर्ष लिंबाचिया आणि ऑरी यांच्यासह अनेक स्टार्स दिसत आहेत. यासोबतच कृष्णा अभिषेकही  'बिग बाॅस 17' च्या फिनालेमध्ये दिसणार आहे. 28 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 ते मध्यरात्री 12 या वेळेत बिग बॉसच्या ग्रॅंड फिनालेची ग्रँड पार्टी होणार आहे. 

 'बिग बाॅस 17'च्या बक्षीस रकमेबद्दल बोलताना मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सीझनच्या विजेत्याला सुमारे 30 ते 40 लाख रुपयांचा चेक दिला जाऊ शकतो. तसेच एक आलिशान कारही मिळणार आहे.  'बिग बाॅस 17' जिंकण्याच्या शर्यतीत मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार आणि मनारा चोप्रा आघाडीवर आहेत.  अंकिता लोखंडे आणि मुनव्वर फारुकीपैकी या दोघांपैकी एक जाण बिग बॉस 17 ची ट्रॉफी जिंकू शकते, असा अंदाज चाहते लावत आहेत.  

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटीटेलिव्हिजनअंकिता लोखंडे