Join us

Bigg Boss 16: अब मजा आयेगा ना भिडू...! हे आहेत ‘बिग बॉस 16’च्या घरात एन्ट्री घेणारे पहिले 5 स्पर्धक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 22:52 IST

Bigg Boss 16 Grand Premiere : रात्री 9.30 च्या ठोक्याला  भाईजान सलमान त्याच्या चिरपरिचित अंदाजात मंचावर आला. मग एकापाठोपाठ एक स्पर्धकांच्या नावाची घोषणा झाली.

Bigg Boss 16 : अखेर प्रतीक्षा संपलीये. ‘बिग बॉस 16’ला सुरूवात झालीये. गेल्या अनेक सीझनपासून सलमान खान हा शो होस्ट करतोय आणि यंदाचा सीझनही सलमान भाईच होस्ट करणार आहे. बिग बॉसच्या घरात कोण कोण जाणार याची उत्सुकता तुम्हाला असणारच. तर चला, स्पर्धकांची घोषणा झालीये.

सलमानच्या तुफानी एन्ट्रीने ‘बिग बॉस 16’ला ग्रँड प्रीमिअरला सुरूवात झाली. रात्री 9.30 च्या ठोक्याला  भाईजान सलमान त्याच्या चिरपरिचित अंदाजात मंचावर आला. मग एकापाठोपाठ एक स्पर्धकांच्या नावाची घोषणा झाली. निमरित कौर अहुवालिया ही बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणारी पहिली स्पर्धक ठरली.

छोटी सरदारनी फेम निमरित कौर अहुवालिया ही बिग बॉसच्या घरात  प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. डेली सोपमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी निमरित बिग बॉसचा शो कसा गाजवणार, हे तर येणारा काळच सांगेल.

तजाकिस्तानचा गायक अब्दु रोझिक हा बिग बॉसच्या घरात जाणारा दुसरा स्पर्धक ठरला.  अब्दुला पाहिलं की तो आठ वर्षाच्या मुलाइतकाच दिसतो, पण त्याचं खरं वय हे नाहीय. तो 19 वर्षांचा आहे.तजाकिस्तानचा हा लोकप्रिय चेहरा आणि आवाज आज जागतिक सेलिब्रिटी स्टार झाला आहे. त्याच्या नावावर जागतिक विक्रमाची नोंद आहे. जगातील सर्वात लहान लोकप्रिय गायक ही ओळख मिळवण्यासाठी अब्दुने खूप कष्ट घेतले आहेत. रॅप साँगसाठी प्रसिद्ध असलेल्या अब्दुने त्याच्या टॅलेंटने लाखो फॅन्स कमावले आहेत. त्याच्या सोशल मीडियावर नजर टाकली तर अडीच मिलीयनहून अधिक फॉलोअर्स आहेत. अब्दुचं ओही दिली झोर हे गाणं जगातील संगीतप्रेमींनी डोक्यावर घेतलं आहे.

बिग बॉसच्या घरात पहिल्या कपलचीही एन्ट्री झालीये. उडारिया फेम प्रियंका चौधरी आणि अंकित गुप्ता हे कपल बिग बॉसच्या घरात दाखल झालं. उडारिया सीरिअलमध्ये दोघांनी तेजू व फतेहची भूमिका साकारली आहे.

बिग बॉसच्या मंचावर आम्ही एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं दोघांनी सांगितलं. पण एक लडका और एक लडकी कभी दोस्त नहीं हो सकते..., असं म्हणत दोघांची पोलखोल केलीच.

रॅपर MC Stan हा बिग बॉसच्या घरात जाणारा पाचवा स्पर्धक ठरला. आपल्या युनिक हेअरस्टाईल व लुकमुळे त्याने येताच सलमानचं मन जिंकलं. मी पुण्याच्या वस्तीत राहणारा मुलगा आहे. माझ्याविरोधात ज्या कॉन्ट्रोव्हर्सी सुरू आहेत, त्यावर मी बोलू इच्छितो, असं तो म्हणाला. त्याचं खरं नाव अल्ताफ आहे.

टॅग्स :बिग बॉससलमान खानटेलिव्हिजनकलर्स