‘बिग बॉस 15’मध्ये (Bigg Boss 15) सध्या जणू भूकंप आला आहे. होय, एकीकडे घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहेत तर दुसरीकडे सिम्बा नागपालनंतर एक नाही तर तीन स्पर्धक घरातून बाद झाले आहेत. गेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने या शॉकिंग एव्हिक्शनचे संकेत दिले होतेच. केवळ टॉप 5 घरात राहतील आणि उर्वरित बॉटम 6 मध्ये असलेले सर्व स्पर्धक घराबाहेर जातील, असं सलमान म्हणाला होता. त्यानुसार, बॉटम 6 मध्ये असलेला सिम्बा नागपाल घरातून आऊट झाला आणि पाठोपाठ अन्य तीन स्पर्धकांचा बिग बॉसच्या घरातील प्रवासही संपला.‘द खबरी’ने दिलेल्या ट्विटनुसार, जय भानुशाली (Jay Bhanushali), विशाल कोटियान (Vishal Kotian) व नेहा भसीन (Neha Bhasin) हे तिघे बिग बॉसच्या घरातून बाहेर झाले आहेत.
‘Bigg Boss 15’च्या घरात ‘भूकंप’! जय भानुशालीसोबत हे दोन स्पर्धकही झाले बाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 11:13 IST
Bigg Boss 15 SHOCKING Eviction: सोशल मीडियावर जय भानुशालीच्या (Jay Bhanushali) एक्झिटच्या बातम्या आधीच आल्या होत्या. पण शोमध्ये अचानक एक ट्विस्ट आला...
‘Bigg Boss 15’च्या घरात ‘भूकंप’! जय भानुशालीसोबत हे दोन स्पर्धकही झाले बाद
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}