Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 13 : सिद्धार्थ शुक्ला चक्क त्याच्या ऑनस्क्रिन सासूसोबत होता नात्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 13:10 IST

दुबईमध्ये दोघांना एकत्र व्हॅकेशन एन्जॉय करताना स्पॉट झाले होते.

सिद्धार्थ शुक्लाने 'बालिका वधू' या प्रसिद्ध मालिकेत काम केले होते. तसेच तो 'खतरों के खिलाडी' मध्ये देखील झळकला होता. 'दिल से दिल तक' या कार्यक्रमात त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. पण त्याला काही कारणास्तव या मालिकेतून काढण्यात आले होते. सिद्धार्थने बिग बॉस 13मध्ये एंट्री करताच सुरूवातीपासून स्ट्राँग कंटेस्टंट म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. आज आम्ही तुम्हाला सिद्धार्थच्या लव्ह लाईफबाबत सांगणार आहोत. सिद्धार्थचे अफेअर तिच्या ऑनस्क्रिन सासूबाबत होते. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार बालिका वधूमध्ये त्याच्या सासूची भूमिका साकारणारी स्मिता बन्सलसोबत सिद्धार्थ रिलेशनशीपमध्ये होता. इतकेच नाही तर दोघांना दुबईत एकत्र व्हॅकेशनदेखील एन्जॉय केले होता.  पण कालांतराने त्यांचे ब्रेकअप झाले. स्मिता म्हणाली, या सगळ्या गोष्टी केवळ अफवा आहेत. तो दोघे फक्त एकमेकांचे को-स्टार होते. 

याशिवाय सिद्धार्थचे नाव आकांक्षा पुरी,  दृष्टि धामी, तनीषा मुखर्जी, आरती सिंग आणि रश्मि देसाईसोबत सुद्धा जोडण्यात आले आहे होते. बिग बॉसच्या घरात रश्मी काही दिवसांपूर्वी सिद्धार्थबाबत एका खुलासा देखील केला होत. 'दिल से दिल तक' मालिकेत सिद्धार्थ आणि रश्मी यांनी एकत्र काम केले होते. रश्मी म्हणाली की, आमचे लव सीन पाहून कुणी म्हणणार नाही की आता शिव्या देऊन बाजूला झाला आहे. तो मला शिव्यांनी मारत होता आणि मी प्रेमाने.

खरेतर रश्मी व सिद्धार्थ शुक्ला यांनी एकत्र कलर्स वाहिनीवरील 'दिल से दिल तक' मालिकेत काम केलं आहे. आता ही मालिका बंद झाली आहे. या मालिकेनंतर हे दोघे बिग बॉस १३मध्ये एकत्र आले आहेत.

टॅग्स :सिद्धार्थ शुक्लाबिग बॉस