Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 13: रश्मी देसाईवर सिद्धार्थ शुक्लाचा राग अनावर, तर चाहत्यांनीही त्याच्या विरोधात सोशल मीडियावर व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 10:06 IST

Bigg Boss 13 : सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्धार्थ शुक्लाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

सिद्धार्थ शुक्लाने 'बालिका वधू' या प्रसिद्ध मालिकेत काम केले होते. तसेच तो 'खतरों के खिलाडी' मध्ये देखील झळकला होता. 'दिल से दिल तक' या कार्यक्रमात त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. पण त्याला काही कारणास्तव या मालिकेतून काढण्यात आले होते. सिद्धार्थने बिग बॉस 13मध्ये एंट्री करताच सुरूवातीपासून स्ट्राँग कंटेस्टंट म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.  

बिग बॉसच्या घरात हा आठवडा वेगळा ठरला, 'बिग बॉस सिझन 13'मध्ये सिद्धार्थ आणि रश्मी हे सगळ्यात जास्त चर्तेत असलेले कंटेस्टंट. मात्र दिलेल्या एका टास्कमध्ये सिद्धार्थ शुक्ला हा रश्मीवर असा काही भडकला की त्याने रागाच्या भरात रश्मीला उलट सुलट सुनावले. सिद्धार्थची बिग बॉसच्या घरात सुरु असलेली अरेरावी पाहून रसिकांचाही राग अनावर झाला आहे.  त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्धार्थ शुक्लाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

अशा प्रकारे सिद्धार्थचे रश्मीसह वाद घालणे रसिकांनाही अजिबात पटलेले नाही. सिद्धार्थ हा ओव्हर अॅग्रेसिव्ह असल्याचे प्रतिक्रीया सोशल मीडियावर उमटत आहेत. दिवसेंदिवस सिद्धार्थचे घरात नखरे वाढत आहेत. त्यामुळे सिद्धार्थ जर आगामी काळातही अशाच प्रकारे खेळत राहिला तर त्याला रसिकांची नापसंती मिळणार हे मात्र नक्की. त्यामुळे वेळे आधीच सिद्धार्थने सावध होणे गरजेचे आहे. 

दुस-या आठवड्यात रश्मी आणि सिद्धार्थ शुक्ला एकमेकांचे चांगले फ्रेंड्स झाल्याचं पहायला मिळाले मात्र नंतर लगेचच या दोघांमध्ये वाद पहायला मिळाला. सिद्धार्थने रश्मीऐवजी आरती सिंगला सुरक्षित केले.  रश्मी देसाई व सिद्धार्थ शुक्ला बेड शेअर करत असल्याचे पाहायला मिळाले.  बेड शेअरिंगनंतर पहिल्या तीनच दिवसांत रश्मी व सिद्धार्थमधील जवळीक वाढू लागली होती. मात्र अचानक या दोघांचे बिनसले आणि सध्या दोघांमध्ये असलेला राग विकोपाला जाणार असेच दिसतंय. 

टॅग्स :रश्मी देसाईसिद्धार्थ शुक्लाबिग बॉस