Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 13 : फिनालेआधी सिद्धार्थ शुक्लाने सर्वांसमोर केले शहनाजला किस, पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 15:56 IST

सिद्धार्थ-शहनाजचा रोमान्स...

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो  बिग बॉस 13 शो कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. घरातील नवीन वाद आणि हायव्हॉल्टेज ड्रामा पाहून हा शो टीआरपी लिस्टमध्ये आला आहे. तूर्तास बिग बॉसच्या घरात सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांच्यातील वाद पेटलेला दिसतोय. एका टास्कमधून हा वाद सुरु झाला आणि विकोपाला पोहोचला. पण त्याआधी, हो... त्याआधी सिद्धार्थ शुक्ला शहनाजला घरातील सर्वांसमोर शहनाजला किस करताना दिसला.

कॅप्टन्सीच्या दावेदारीतून शहनाज पहिल्या फेरीत बाद झाली होती. सिद्धार्थ मात्र अद्यापही या शर्यतीत टिकून आहे. याच कॅप्टन्सी टास्कदरम्यान शहनाज सिद्धार्थच्या जवळ येते. ‘तूने आज मेरी तारीफ नहीं की. कसम है तुझे मुझे किस कर,’ असे ती सिद्धार्थला म्हणते. यावर सिद्धार्थ तिची प्रशंसा करतो पण किस करायला नकार देतो. सिद्धार्थने नकार देताच शहनाज नाराज होते. तू किस नहीं करेगा तो मैं तुझसे बात नहीं करूंगी, जब तक इस शो में हू, असे ती म्हणते. यानंतर सिद्धार्थ शहनाजला जवळ बोलवतो आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतो. अर्थात टास्कनंतर दोघांमध्ये पुन्हा भांडण होते.

सिद्धार्थ शुक्लाने बालिकावधू या प्रसिद्ध मालिकेत काम केले होते. तसेच तो खतरों के खिलाडीमध्ये देखील झळकला होता. दिल से दिल तक या कार्यक्रमात त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. पण त्याला काही कारणास्तव या मालिकेतून काढण्यात आले होते. बिग बॉसच्या घरात सिद्धार्थने सुरूवातीपासून लोकप्रियता मिळवली. या शोच्या विजेतेपदाचा तो मोठा दावेदार मानला जात आहे.

टॅग्स :सिद्धार्थ शुक्लाशेहनाझ गिलबिग बॉस