Join us
Daily Top 2Weekly Top 5

माहिरा शर्मा सोशल मीडियावर झाली ट्रोल, युजर्स म्हणाले गरीबों की आलिया भट्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 16:04 IST

Bigg Boss 13 : जेव्हा माहिरा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली तेव्हा बिग बॉसचे चाहते खूप खूश झाले होते. लोकांचं म्हणणं होते की,माहिरा शर्माला सुरूवातीपासूनच शोमधून बाहेर काढायला हवं होतं.

'बिग बॉस 13' ची स्पर्धक माहिरा शर्माची सोशल मीडियावर सध्या जोरदार खिल्ली उडवली जात आहे. जो कोणी तिचा हा फोटो बघतोय प्रत्येकजण तिच्या या फोटोवर टीका करतोय. माहिराने फिशलेट हेयरस्टाइल आणि डेजी ब्लू ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केलेला फोटो शेअर केला हा फोटो पाहून सा-यांनीच गरीबों की आलिया भट्ट अशी कमेंट करत तिची खिल्ली उडवली. यात तिन आलिया भट्टच्या ड्रेसिंग पासून ते हेअर स्टाइलपर्यंत सगळंच कॉपी केल्याचे पाहायला मिळतंय. 

मुळात माहिराला रसिकांकडून नापसंतीच मिळाली. तिला बिग बॉसमध्ये पाहूनच रसिकांना कंटाळवाणे झाले होते, त्यामुळे वारंवार तिने या शोमधून बाहेर पडावे अशी रसिकांना वाटायचे. जेव्हा माहिरा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली तेव्हा बिग बॉसचे चाहते खूप खूश झाले होते. लोकांचं म्हणणं होते की,माहिरा शर्माला सुरूवातीपासूनच शोमधून बाहेर काढायला हवं होतं. ही गोष्ट वेगळी आहे की असं काहीच झालं नाही. माहिरा आणि पारस यांनी एक टीम बनवून गेम खेळत राहिले. सगळ्यांत माहिरा खूप इरिटेटींग कंटेस्टंट असल्याचे सगळ्यांना वाटायचे.

माहिराने 'नागिन 3' मध्ये काम केले होते. ती मुळची जम्मू काश्मीरची असून तिने पार्टनर्स ट्रबल हो गयी डबल, तारक मेहता का उल्टा चष्मा, कुंडली भाग्य यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. 

टॅग्स :माहिरा शर्माबिग बॉस