Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 13: Shocking...! कोयना मित्राच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्यासोबत केला होता मोठा कारनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 16:03 IST

कोयनाने बिग बॉसमध्ये आपल्या खासगी आयुष्याबद्दल सांगितलं.

बिग बॉसच्या तेराव्या सीझनमध्ये अभिनेत्री कोयना मित्रा घरात एन्ट्री केल्याच्या पहिल्या दिवसापासून चांगलं परफॉर्म करते आहे. पाचव्या दिवशी कोयनाने बिग बॉसमध्ये आपल्या खासगी आयुष्याबद्दल सांगितलं. तिने सांगितलं की, तिचा एक्स बॉयफ्रेंड खूप पझेसिव्ह होता.

कोयना मित्राने दलजीत कौर, माहिरा शर्मा, सिद्धार्थ यांच्यासोबत आपल्या लव्ह लाईफबद्दल सांगितलं.कोयनाने घरातल्या सदस्यांना सांगितलं की, तिचा एक्स बॉयफ्रेंड तुर्कीतला होता.

कोयनाने सांगितलं की, माझा एक्स बॉयफ्रेंड तिच्याबाबतीत खूप पझेसिव्ह होता. कोयनाने तिच्या एक्स बॉयफ्रेंडबाबतचा किस्सा सांगितल्यावर सगळे हैराण झाले. तिने सांगितलं की, त्याने तिच्या मुंबईतल्या घरातील बाथरूममध्ये तिला बंद केले होते. ती म्हणाली की, त्याने मला सांगितलं होते की, माझ्यासोबत लग्न केल्यानंतर तुझा पासपोर्ट जाळून टाकणार आणि तुर्कीला निघून जाणार. त्याच्यासोबत नातं तोडल्यानंतर मी तीन वर्षे कोणासोबत डेटिंग करण्याबाबत विचारही माझ्या मनात आला नाही.

कोयना अपना सपना मनी मनी चित्रपटात काम केल्यानंतर बॉलिवूडमधून गायब झाली होती. कोयनाने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मॉडेलिंग क्षेत्रात आपलं नशीब आजमावलं होतं. यावेळी तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. 

कोयनाच्या जीवनात एक मोठं वादळ आलं, ज्यामुळे तिचे करिअर पणाला लागलं. त्या काळात कोयना आपल्या चेहऱ्यावर खुश नव्हती. त्यामुळे आणखी सुंदर दिसण्यासाठी कोयनाने प्लास्टिक सर्जरी केली.तिने नाकाची सर्जरी केली. मात्र या सर्जरीचा उलट परिणाम झाला. सर्जरीमुळे कोयनाचा चेहरा आणखी खराब झाला. कधीकाळी कोयनाकडे अभिनयासह काही आयटम नंबर होते, मात्र सर्जरीनंतर दिग्दर्शकांनी कोयनाकडे पाठ फिरवली.

कोयनाला या सर्जरीमुळे काम मिळणं बंद झालं. तिच्यावर घरी बसण्याची वेळ आलीय. चित्रपटसृष्टीपासून ती दूर गेली.

टॅग्स :बिग बॉसकोएना मित्रा