Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस १२ मध्ये मिलिंद सोमणसहीत हे कलाकार करू शकतात प्रेक्षकांचं मनोरंजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 13:17 IST

आता हिंदी बिग बॉसची चर्चा सुरु झाली आहे. या वेळचा सीझन वेगळा ठरणार आहे कारण यावेळी जोडी कॉन्सेप्ट असणार आहे.

सर्वात जास्त वादग्रस्त ठरणारा रिअॅलिटी शोचं बिग बॉसचा १२वा सीझन लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून याची जोरदार चर्चा रंगली आहे. मराठी बिग बॉस नुकतंच संपलं. आता हिंदी बिग बॉसची चर्चा सुरु झाली आहे. या वेळचा सीझन वेगळा ठरणार आहे कारण यावेळी जोडी कॉन्सेप्ट असणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या जोड्या यात बघायला मिळणार आहे. तशी तर अजून बिग बॉसच्या घरात यावेळी कुणाला एन्ट्री मिळणार याची अधिकृत यादी प्रकाशित झाली नाहीये पण काही नावांची चर्चा जोरदार रंगली आहे. चला जाणून घेऊ कोण आहेत ही मंडळी..

डेनी डी आणि माहिका शर्मा

माहिका शर्माला बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवायचं आहे. ती नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि सोशल मीडियात डबल मिनींग पोस्ट करण्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने तिचा पार्टनर अॅडल्ट सिनेमांचा स्टार डेनी डी याला समोर आणलं होतं. हे दोघेही 'द मॉडर्न कल्चर' सिनेमात एकत्र काम करणार आहेत. त्यामुळेच या जोडीला बिग बॉसच्या घरात एन्ट्री मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

मिलिंद सोमण - अंकिता कोंवर

मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर यांनी नुकतंच लग्न केलं असून दोघेही त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत  आले आहेत. या दोघांनाही या घरात घेण्यासाठी अॅप्रोच करण्यात आला आहे. पण मिलिंद या शोमध्ये सहभागी होण्यासाठी मोठी रक्कम मागत असल्याची चर्चा आहे. 

प्रिया प्रकाश आणि रोशन अब्दुल

आपल्या डोळ्यांच्या खास इशाऱ्याने अनेकांना घायाळ करणारी प्रिया प्रकाश आणि तिचा सहकलाकार रोशन अब्दुल या शोमध्ये येण्याची शक्यता आहे. पण दोघांनीही याबाबत काही अधिकृत खुलासा केला नाहीये. 

संध्या बींदणी आणि रोहित राज गोयल

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री संध्या बींदणीला तिच्या पतीसोबत या शोमध्ये आणण्यासाठी अॅप्रोच करण्यात आलाय. जेव्हा तिला याबाबत विचारण्यात आले तेव्हा अशी कोणतीही ऑफर मिळाली नसल्याचे तिने सांगितले. 

निकीता गोखले आणि इम्तियाज अली

(Image Credit : Nikita Gokhale Facebook)

२०१५ मध्ये मिस इंडिया बिकीनीचा किताब जिंकणारी मराठमोळी मॉडल-अभिनेत्री निकीती तिचा एक्स बॉयफ्रेन्ड इम्तियाज अलीसोबत या शोमध्ये दिसण्याची शक्यता आहे. निकीता ही तिच्या प्लेबॉय मॅजझिनसाठी केलेल्या फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. निकीता या शोमध्ये येण्यासाठी रेडी आहे. पण चॅनलकडून अधिकृत घोषणा झाली नाहीये. 

कॉमेडियन सिद्धार्थ सागर आणि सुबुही जोशी

कॉमेडियन सिद्धार्थ सागर आणि त्याची गर्लफ्रेन्ड सुबुही जोशी यांना या शोमध्ये सहभागी होण्यासाठी अॅप्रोच करण्यात आलाय. अॅप्रोचच्या बातमीला त्यांनीही दुजोरा दिला असून आताच त्यावर काही बोलणे घाईचे होईल असे ते म्हणाले. 

फलक नाज आणि शफक नाज

फलक नाज आणि शफक नाज ही जोडी नुकतीच कौटुंबिक वादामुळे चर्चेत आली होती. त्यांनाही या शोसाठी अॅप्रोच करण्याक आलं आहे. पण फलकने हे वृत्त नाकारलं आहे.  

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी