Join us
Daily Top 2Weekly Top 5

घमासान...! जानेवारी 2020 मध्ये बॉक्स ऑफिसवर रंगणार ‘बिग फाईट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 08:00 IST

अधिकाधिक गल्ला जमवण्याच्या लालसेने प्रत्येक कलाकार, निर्माता व दिग्दर्शकाला रिलीजसाठी चांगले मुहूर्त हवे असते. अशात बॉक्स ऑफिसवरचा संघर्ष अटळ ठरतो.

ठळक मुद्देजानेवारीच्या अखेरिस म्हणजे 31 जानेवारीला सैफ अली खास त्याच्या प्लेबॉय इमेजमध्ये रूपेरी पडद्यावर परतणार आहे.

बॉक्स ऑफिसवर चा संघर्ष बॉलिवूडसाठी नवा नाही. अलीकडे अनेक मेकर्स या संघर्षात उडी घेणे टाळतात दिसतात. पण अधिकाधिक गल्ला जमवण्याच्या लालसेने प्रत्येक कलाकार, निर्माता व दिग्दर्शकाला रिलीजसाठी चांगले मुहूर्त हवे असते. अशात बॉक्स ऑफिसवरचा संघर्ष अटळ ठरतो. नव्या वर्षाच्या जानेवारी महिन्यातही असाच संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे.

3 जानेवारी : सब कुशल मंगल vs शिमला मिर्ची

रवी किशनची मुलगी रीवा किशन व पद्मिनी कोल्हापुरेचा मुलगा प्रियांक शर्मा ‘सब कुशल मंगल’ या सिनेमातून डेब्यू करत आहेत. यात अक्षय खन्नाही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. 3 जानेवारीला हा सिनेमा रिलीज होतोय. याच दिवशी राजकुमार राव, रकुल प्रीत सिंग आणि हेमा मालिनी स्टारर ‘शिमला मिर्ची’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय.

10 जानेवारी : छपाक vs तान्हाजी

जानेवारीमध्ये अजय देवगनचा ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ हा सिनेमा रिलीज होणार आहे. याच तारखेला दीपिका पादुकोणचा बहुप्रतिक्षीत ‘छपाक’ हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे. यात कोण बाजी मारतो, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

24 जानेवारी : स्ट्रीट डान्सर 3 डी vsपंगा

जानेवारी महिन्यात कंगना राणौत वरूण धवनसोबत पंगा घेताना दिसणार आहे. होय, 24 जानेवारीला कंगनाचा ‘पंगा’ हा स्पोर्ट ड्रामा रिलीज होतोय. याच तारखेला  वरूण धवन आणि श्रद्धा कपूर स्टारर ‘स्ट्रीट डान्सर 3डी’ हा सिनेमा रिलीज होणार आहे. 

31 जानेवारी : हॅपी हार्डी अ‍ॅण्ड हीर vs जवानी जानेमन

जानेवारीच्या अखेरिस म्हणजे 31 जानेवारीला सैफ अली खास त्याच्या प्लेबॉय इमेजमध्ये रूपेरी पडद्यावर परतणार आहे. त्याचा ‘जवानी जानेमन’ हा सिनेमा या तारेखला प्रदर्शित होतोय. याच दिवशी हिमेश रेशमियाचा ‘हॅपी हार्डी अ‍ॅण्ड हीर’ रिलीज होतोय.

टॅग्स :छपाकतानाजीबॉलिवूड