Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला भीती वाटतेय...", डिलिव्हरीआधी प्रचंड घाबरली होती भारती सिंग, नेमकं काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 13:20 IST

डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलला जाण्याआधीच घरातच भारतीचं वॉटर ब्रेक झालं होतं. त्यानंतर तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

लाफ्टर क्वीन भारती सिंगने काही दिवसांपूर्वीच तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला. भारतीला शुक्रवारी(१९ डिसेंबर) पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. पण, डिलिव्हरी आधी भारती प्रचंड घाबरली होती. भारतीच्या डिलिव्हरी आधाची एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये लाफ्टर क्वीन डिलिव्हरीच्या आधी नेमकं काय घडलं होतं, हे सांगत आहे. भारतीने व्लॉग शेअर करत याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. 

डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलला जाण्याआधीच घरातच भारतीचं वॉटर ब्रेक झालं होतं. त्यानंतर तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. व्हिडीओत भारती सिंग म्हणते की "सकाळी ६ वाजले आहेत. माझे कपडे, अंथरुण ओलं झाल्याने मी डॉक्टरला फोन केला. ते म्हणाले की तुमची वॉटर बॅग(ज्यामध्ये बाळ असतं) ती ब्रेक झाली आहे. तुम्ही लगेचच हॉस्पिटलला जा. रात्री मी सगळं नीट करत होते आणि आज मला सकाळीच हॉस्पिटलला जावं लागतंय". त्यानंतर भारती अचानक रडू लागते. 

पुढे व्हिडीओत ती म्हणते की "मला काहीच कळत नाहीये. बाकी लोक माझी बॅग भरत आहेत. आम्ही आता हॉस्पिटलला जात आहोत. रात्रीपासूनच मला कसं तरी वाटत होतं. काय होतंय ते कळत नव्हतं. माझ्यासाठी आणि बाळासाठी प्रार्थना करा". हॉस्पिटलला जाताना भारती तिच्यासोबत गणपतीची छोटी मूर्तीही घेऊन गेली होती. "मी ही मूर्तीही सोबत घेऊन जात आहे. गणपती बाप्पा सगळं सांभाळून घेतील", असंही भारती पुढे म्हणत आहे. त्यानंतर भारती भावुक झाल्याचं दिसत आहे. मला खूप भीती वाटत आहे, असंही ती म्हणत आहे. त्यानंतर हॉस्पिटलमधले अपडेट पुढे व्हिडीओत भारती आणि हर्षने चाहत्यांना दिले आहेत. 

भारती आणि हर्षने २०१७ मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर काही वर्षांनी भारतीने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला होता. ज्याचं नाव लक्ष आहे पण लाडाने सगळे त्याला गोला म्हणतात. आता ४१व्या वर्षी भारतीने तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. चाहत्यांनी भारती आणि हर्षचं अभिनंदन केलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bharti Singh's delivery fear: Water broke unexpectedly, rushed to hospital.

Web Summary : Bharti Singh, days before delivering her second child, a son, experienced a water break at home and was rushed to the hospital. Overwhelmed with fear, she shared her emotional journey with fans, seeking prayers before the delivery.
टॅग्स :भारती सिंगटिव्ही कलाकार