Bharat Ganeshpure: स्ट्रगल करून मोठे झालेले मराठी ग्लॅमर इंडस्ट्रीतील एक नाव म्हणजे भारत गणेशपुरे. वैदर्भीय स्टाईल आणि वऱ्हाडी भाषेवर प्रभुत्व त्यामुळे त्यांनी प्रेक्षकांचे मनात खास स्थान निर्माण केले आहे. विविध ताकदीच्या भूमिक्या त्यांनी साकरल्या आहेत. अलीकडेच भारत गणेशपुरे यांनी शेतामधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये गहू शेती पाहायला मिळत आहे.
भारत गणेशपुरे हे गावी शेतीत रमल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्याने अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ते म्हणतात, "नमस्कार... तुम्ही मला नेहमी विचारता सारखं सारखं गावी का जातो? तर हे पाहा. हे सुख, समृद्धी पाहायला गावी यावं लागतं. आता शेतात गहू पेरला आहे. साधारण एका महिन्याने हा गहू घरच्या ताटात येऊ शकतो. गहू पूर्ण झाल्यावर मी एखादी झलक तुम्हाला नक्की दाखवेन". गणेशपुरे यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्याचे कौतुक केलं आहे.