Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाग्यश्रीलाही पडली 'गुलाबी साडी'ची भुरळ; सलमानच्या अभिनेत्रीने केला जबरदस्त डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 19:00 IST

Bhagyashree: 'मैंने प्यार किया' या सिनेमाच्या माध्यमातून नावारुपाला आलेल्या भाग्यश्रीने 'गुलाबी साडी' गाण्याचा ट्रेंड फॉलो केला आहे.

सूरज बडजात्या यांच्या 'मैंने प्यार किया' या सिनेमाच्या माध्यमातून इंडस्ट्रीत पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री (Bhagyashree). सौंदर्य, स्वभावातील साधेपणा आणि उत्तम अभिनय यांच्या जोरावर भाग्यश्रीने ९०चा काळ गाजवला. विशेष म्हणजे मैंने प्यार कियाच्या माध्यमातून ती रातोरात सुपरस्टार झाली. भाग्यश्रीची क्रेझ आजही कमी झाली नसून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असते.

भाग्यश्रीचा कलाविश्वातील वावर पूर्वीपेक्षा बराच कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय आहे. सोशल मीडियावर बऱ्याचदा ती तिचे फिटनेस सिक्रेट नेटकऱ्यांसोबत शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने एक ट्रेंडिंग व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने चक्क एक व्हायरल ट्रेंड फॉलो केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'गुलाबी साडी आणि लाली लाल लाल' हे गाणं तुफान ट्रेंड होतंय. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या गाण्यावर व्हिडीओ शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या गाण्याची भूरळ आता बॉलिवूड कलाकारांनाही पडली असून भाग्यश्रीने हा ट्रेंड फॉलो केला आहे.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये भाग्यश्रीला अभिनेत्री शीबा साबिर हिचीदेखील साथ मिळाली आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर शीबा चाहत्यांच्या समोर आली. शीबाने १९९२ मध्ये आलेल्या सूर्यवंशी या सिनेमात काम केलं होतं. तसंच  प्यार का साया, मिस 420, ये आग कब बुझेगी आणि सनमम तेरी कसम या सिनेमांमध्ये ती झळकली होती. 

टॅग्स :बॉलिवूडभाग्यश्रीसेलिब्रिटीसिनेमा