Join us
Daily Top 2Weekly Top 5

'माझा होशील ना' मालिकेतील सई आणि दादा मामांमध्ये रंगला बॅडमिंटनचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 16:54 IST

मालिकेतील सगळीच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे.

'माझा होशील ना' ही मालिका दिवसेंदिवस रंजक आणि रसिकांची लाडकी मालिका बनत चालली आहे. सुरुवातीपासून रंजक वळणामुळे रसिकही मालिकेला खिळून आहेत.दिवसेंदिवस मालिका आणखी रंजक होत आहे. मालिकेतील सगळीच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहेत. या मालिकेत गौतमी साकारत असलेली सईची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. कोरोनामुळे घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे या मालिकेच शूटिंग काही दिवसांसाठी बंद होत..पण मनोरंजन थांबलं नाही आणि थांबणार ही नाही!!" असं म्हणत कलाकारांनी पुन्हा शुटींगला सुरुवात केली..सध्या या मालिकेच शूटिंग सिलवासामध्ये सुरु आहे.. 

त्यात शूटिंग दरम्यान वेळ मिळाल्यावर या कलाकारांची चांगलीच धम्माल सुरु असते. सई आणि दादा मामांमध्ये बॅडमिंटनचा सामना रंगलाये. सई चक्क साडीमध्ये बॅडमिंटन खेळताना दिसतेय.  त्यामुळे कलाकार सध्या २४ तास एकत्र असल्यानं शुटींगसोबतच धम्माल देखील करतायेत असंच दिसतंय. सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

एप्रिल महिन्यात माझा होशील ना'च्या शूटिंगसाठी सर्व कलाकार मनालीला गेले आहेत. त्यावेळी तिथले धमाल करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.  

टॅग्स :गौतमी देशपांडेझी मराठी