गुणी अभिनेता म्हणून ओळखला जाणारा त्याच्या अभिनयासाठी, हटके भूमिकांसाठी ओळखला जातो. अभिनयाबरोबरच त्याला त्याच्या गाण्यांसाठीदेखील मोठी लोकप्रियता मिळताना दिसते. आयुषमान खुराणानंबॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तो कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. हा पुन्हा एकदा त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आयुषमान खुराणा हा 'ड्रीम गर्ल 2' नंतर कोणताही चित्रपट घेऊन आलेला नाही. आता आयुषमानच्या हाती मोठ्या बॅनरचा चित्रपट लागला आहे.
यशराज फिल्म्सच्या चित्रपटात काम करण्याची आयुषमान खुराणाची इच्छा होती. आता त्याचं हे स्वप्न पुर्ण होणार आहे. कारण, आता अभिनेता हा यशराज फिल्म्स आणि पोषम पा पिक्चर्सच्या भागीदारीतील पहिल्या मोठ्या चित्रपटात मुख्य अभिनेता असणार आहे. हा सिनेमा एक थरारक अनुभव देणारा असणार आहे. मात्र, या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. समीर सक्सेना या थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. समीरने यापूर्वी 'मामला लीगल है' आणि 'काला पानी' या सीरिज केल्या आहेत.
आयुषमान खुराणाचा पुढील वर्षी रश्मिका मंदानासोबत 'थामा' हा सिनेमा रिलीज होणार आहे. 'थामा'मध्ये एक रोमांचक प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. ज्यात प्रेम आणि रक्तरंजित थरार दिसेल. हा चित्रपट दिवाळी 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आयुषमान खुराणा आणि रश्मिका मंदानासोबत परेश रावल आणि नवाजुद्दीन सिद्दीकीसारखे प्रतिभावान कलाकारही या चित्रपटाचा भाग असतील. ब्लॉकबस्टर ‘मुंज्या’ फेम दिग्दर्शक आदित्य सर्पोतदार हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. येणाऱ्या वर्षात आयुषमान खुराणाचा बोलबाला असणार आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.