Join us

अवधूत गुप्तेनं खारमध्ये खरेदी केलं नवीन अलिशान घर, किंमत तब्बल 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 13:03 IST

लोकप्रिय गायक, संगीतकार, सिनेमा निर्माता, दिग्दर्शक असलेल्या अवधूत गुप्तेची स्वप्नपूर्ती झाली आहे. 

Avadhoot Gupte New Home :  'ऐका दाजीबा' 'हळू हळू चाल', 'राणी माझ्या मळ्यामंदी…' यांसारखी अनेक गाणी गायक अवधूत गुप्ते याने मराठी सिनेविश्वाला दिली आहे. अवधूत गुप्ते इंडस्ट्रीमधील लोकप्रिय गायक, संगीतकार, सिनेमा निर्माता, दिग्दर्शक आहे. कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असणाऱ्या अवधूत गुप्तेने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. अवधूत गुप्तेने नुकतंच मुंबईत नवीन घर घेतलं आहे. ऐन दिवाळीत अवधूत गुप्तेची स्वप्नपूर्ती झाली आहे. 

अवधूत गुप्तेने मुंबईतील खार पश्चिम येथे नवीन घर खरेदी केले आहे. या घराची किंमत लाखांमध्ये नाही तर कोटींमध्ये आहे.  तब्बल ७ कोटी ७५ लाख रुपये त्याने या नव्या घरासाठी मोजले आहेत. खार पश्चिम परिसरातील विठ्ठलभाई पटेल मार्गावरील रुस्तमजी पॅरामाऊंट संकुलात हे घर आहे. या घराचे  क्षेत्रफळ १३,५७७ चौरस फूट इतकं मोठं आहे. तर खास गोष्टमध्ये यामध्ये तीन गाड्यांच्या पार्किंगचीदेखील सुविधा आहे. 

गेल्या ऑक्टोबर महिन्यात अवधूत गुप्तेने घराचा व्यवहार पूर्ण केल्याचं माहिती आहे. महाराष्ट्र टाईम्सनुसार या घरासाठी त्याने ४६ लाख ४८ हजार रूपयांची स्टॅम्पड्युटी आणि ३० हजार रूपये नोंदणीशुल्क भरले.  अवधूतने याबद्दल कोणतीही माहिती अद्याप शेअर केलेली नाही.  दरम्यान, बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच त्याच्या कुटुंबासह राहतो.  तसेच पुण्यातही त्याचे सुंदर फार्महाऊस असल्याची माहिती आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या जयतपाड या गावात त्याचा प्रशस्त फार्म हाऊस आहे. गुप्ते फार्महाऊस असं त्याच्या हा फार्महाऊसचं नाव आहे.  बऱ्याचदा अवधूतचे मित्रमंडळीदेखील या फार्म हाऊसला भेट देत असतात.

अवधूतने मराठी आणि हिंदीतील अनेक गाण्यांचं त्याने  पार्श्वगायन केलं आहे. तसेच अनेक लोकप्रिय संगीत अल्बमला त्यांनी संगीत दिलं आहे. मराठी सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे. अवधूतला रोखठोक भूमिका मांडण्यासाठी ओळखलं जातं. आता चाहते त्याच्या नव्या प्रोजेक्टची वाट पाहत आहेत. 

टॅग्स :अवधुत गुप्ते मुंबईसेलिब्रिटीसुंदर गृहनियोजन