Join us

अतुल कुलकर्णी सांगतोय यामुळे केली जाते राजकीय जाहिरातबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 18:10 IST

अतुलने नुकतेच एक ट्वीट केले असून हे ट्वीट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याने या ट्वीटमध्ये राजकीय जाहिरात का केली जाते याविषयी लिहिले आहे.

ठळक मुद्देज्यांचा स्वतःवर कमी विश्वास असतो. अशा लोकांसाठी अशाप्रकारच्या जाहिराती असतात. आपले ठाम मत नसलेल्या लोकांना समोर ठेवूनच या जाहिराती बनवल्या जातात. एकाच मतावर टिकून न राहाता सतत वेगळी दिशा शोधणाऱ्या लोकांसाठी या जाहिराती असतात.

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून अनेक नेते मंडळी प्रचारासाठी विविध मतदार संघ पिंजून काढत आहेत. या निमित्ताने नेतेमंडळी मनमोकळेपणाने मतदारांशी संवाद साधत आहेत. तसेच विविध पक्ष जाहिरातींच्या माध्यमांद्वारे आपल्या पक्षाचा प्रचार करत आहेत. या विविध माध्यांद्वारे राजकीय जाहिरातबाजी का केली जाते याविषयीचे आपले मत अतुल कुलकर्णीने नुकतेच ट्वीटर या सोशल नेटवर्किंगद्वारे मांडले आहे. 

 

अतुलने नुकतेच एक ट्वीट केले असून हे ट्वीट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याने या ट्वीटमध्ये राजकीय जाहिरात का केली जाते याविषयी लिहिले आहे आणि हे लिहिण्याअगोदर त्याने जाहिरात विशेषज्ञ असलेल्या त्याच्या एका मित्रासोबत चर्चा केली असल्याचे त्याने सांगितले आहे. या ट्वीटमध्ये अतुलने लिहिले आहे की, ज्यांचा स्वतःवर कमी विश्वास असतो. अशा लोकांसाठी अशाप्रकारच्या जाहिराती असतात. आपले ठाम मत नसलेल्या लोकांना समोर ठेवूनच या जाहिराती बनवल्या जातात. एकाच मतावर टिकून न राहाता सतत वेगळी दिशा शोधणाऱ्या लोकांसाठी या जाहिराती असतात. दिनाहिन लोकांना सुचना देण्यासाठी या जाहिराती बनवल्या जातात.

माझ्या एका जाहिरात क्षेत्रात असलेल्या दिग्गज मित्रासोबत चर्चा करूनच मी या निष्कर्षावर पोहोचलो आहे. हा निष्कर्ष त्याच्यासोबत चर्चा केल्यानंतर मी काढला असला तरी मला देखील या गोष्टी पटलेल्या आहेत. माझ्या या मित्राचे नाव रंजन मलिक असून तो जाहिरात क्षेत्रातील दिग्गज आहे. 

 

अतुल कुलकर्णीने आजवर अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने नटरंग या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले आहे. आमिर खानच्या रंग दे बसंती या चित्रपटात देखील त्याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सध्या सिटी ऑफ ड्रीम्स ही त्याची वेबसिरिज प्रेक्षकांना पाहायला मिळत असून विशेष म्हणजे या वेबसिरिजमध्ये त्याने एका राजकारण्याचीच भूमिका साकारली आहे. अभिनयासोबत आता अतुल एका वेगळ्या क्षेत्राकडे वळला आहे. आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या आगामी चित्रपटाचे लेखन अतुलने केले आहे. 

टॅग्स :अतुल कुलकर्णीलोकसभालोकसभा निवडणूक २०१९