Join us

अथिया-राहुल पोहोचले सुब्रमण्यम स्वामी मंदिरात; पारंपरिक वेशातील लूकने लक्ष वेधलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 14:58 IST

अथिया आणि राहुल आशीर्वाद घेण्यासाठी बंगळुरूमधील घाटी सुब्रमण्यम स्वामी मंदिरात पोहचले.

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल यांनी कर्नाटकातील घाटी सुब्रमण्यम स्वामी मंदिराला भेट दिली. अथिया आणि केएल राहुलच्या समोर आलेल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोघेही खूप सिंपल लूकमध्ये दिसत आहेत.

श्रावण महिना संपत आला असताना, अथिया आणि राहुल आशीर्वाद घेण्यासाठी बंगळुरूमधील घाटी सुब्रमण्यम स्वामी मंदिरात पोहचले. यावेळी प्रिंटेड फ्लोरलसलवार सूटमध्ये अथिया दिसली. तर राहुल कॅज्युअल पांढरा टी-शर्ट आणि पँटमध्ये होता.

अथियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे, तर तिने 2015 मध्ये 'हिरो' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती 2017 मध्ये 'मुबारकां' चित्रपटात दिसली. अथिया शेवटची 2019 मध्ये 'मोतीचूर चकनाचूर'मध्ये दिसली होती. राहुल आणि अथिया शेट्टी २३ जानेवारी रोजी विवाहबंधनात अडकले. लग्नापूर्वी अथिया-राहुल तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.

तर दुखापतीमुळे केएल राहुलने श्रीलंकेत सुरू असलेल्या आशिया कपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. राहुलची फिटनेस टेस्ट ४ सप्टेंबर रोजी पुन्हा घेण्यात येणार आहे. तो तंदुरुस्त सिद्ध झाल्यास आशिया चषकाच्या आगामी सामन्यांमध्ये संघासोबत खेळताना दिसणार आहे. गेल्या 1 मेला एका सामन्यात राहुल जखमी झाला होता. त्यानंतर, राहुलच्या मांडीवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर राहुलने कोणताही आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत सामना खेळलेला नाही.

टॅग्स :अथिया शेट्टी लोकेश राहुलबॉलिवूडक्रिकेट सट्टेबाजी