भारतीय क्रिकेटपटू के एल राहुलची (K L Rahul) पत्नी अभिनेत्री अथिया शेट्टीने (Athiya Shetty)काही दिवसांपूर्वीच गुडन्यूज दिली. यावर्षी दोघंही आईबाबा होणार आहेत. टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. क्रिकेटपटूंच्या पत्नीही त्यांना पाठिंबा देण्यासाठी ऑस्ट्रेलियात आहेत. यावेळी टू बी मॉम अथिया शेट्टीचीही झलक दिसली. अथिया बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली तर तिच्यासोबत अनुष्का शर्माही होती.
ब्लॅक अँड व्हाईट स्ट्राईप टॉप आणि ब्लू बेज पँट अशा लूकमध्ये अथिया चालताना दिसत आहे. तर तिच्यासमोरच अनुष्का शर्माही दिसत आहे. यावेळी अथियाचा बेबी बंप स्पष्ट दिसतोय. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवरचा हा व्हिडिओ आहे. सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिज सुरु आहे. त्यातच क्रिकेटपटूंच्या पत्नीही स्टेडियममध्ये दिसत आहेत. अथिया राहुलसोबत पहिल्या दिवसापासूनच होती. लग्नानंतर दोन वर्षांनी राहुल आणि अथिया आईबाबा होणार आहेत.
सध्या अथिया जास्त वेळ अनुष्का शर्मासोबत दिसून येते. सध्या अथिया-राहुल आणि विराट-अनुष्काचे अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अथिया आणि राहुल यांनी जानेवारी २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. आता लग्नानंतर दोन वर्षात त्यांनी गुडन्यूज दिली आहे. अथिया शेट्टी आता सिनेमातून गायब झाली आहे. 'हिरो' सिनेमातून तिने सूरज पांचोलीसोबत पदार्पण केलं. नंतर ती 'मुबारका' आणि 'मोतीचुर चकनाचुर' या सिनेमांमध्ये दिसली. फ्लॉप करिअरमुळे ती सिनेसृष्टीतून गायब झाली. नंतर के एल राहुलला ती डेट करत असल्याच्या चर्चा येऊ लागल्या. २०२३ च्या सुरुवातीलाच त्यांनी लग्नगाठ बांधली.