Join us

'आता होऊ दे धिंगाणा' शोने पूर्ण केले १०० भाग, सिद्धार्थ म्हणतो- "बापरे, मी या कार्यक्रमाचा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 13:58 IST

'आता होऊ दे धिंगाणा' शोचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने सिद्धार्थने खास पोस्ट शेअर केली आहे.

दमदार, मिश्किल आणि कायम एनर्जेटिक असणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सिद्धार्थने अभिनय आणि टॅलेंटच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. सिद्धार्थ सध्या स्टार प्रवाहवरील 'आता होऊ दे धिंगाणा' या रिएलिटी शोचं सूत्रसंचालन करत आहे. या शोमध्येही त्याच्या खेळकर स्वभावाने तो प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. 

'आता होऊ दे धिंगाणा' या शोचा तिसरा सीझन सुरू आहे. या शोमध्ये स्टार प्रवाहवरील मालिकेतील कलाकार सहभागी होऊन खेळ खेळत धमाल आणतात. 'आता होऊ दे धिंगाणा' शोचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने सिद्धार्थने खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने स्टार प्रवाहाच्या टीमचे आभार मानले आहेत. "काय आणि कसे आभार म्हणून स्टार प्रवाह टीमचे...मला कळत नाही. 'आता होऊदे धिंगाणा'चा शंभरावा एपिसोड...बापरे मी या कार्यक्रमाचा भाग होईन किंवा हा कार्यक्रम मला HOST करायला मिळेल आणि  महाराष्ट्राचे मायबाप रसिक प्रेक्षक एवढं प्रेम करतील हे कधीच वाटलं नव्हतं", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

पुढे तो म्हणतो, "मी खूप वेळा पाहायचो की ह्या मालिकेने शंभर भाग पूर्ण केले, या मालिकेने 200 भाग पूर्ण केले, या मालिकेने 300 भाग पूर्ण केले...पण आता मी त्या एका कार्यक्रमाचा भाग आहे ज्यांनी शंभर एपिसोड पूर्ण केले. हा एक कथाबाह्य कार्यक्रम आहे आणि गेले तीन वर्ष मी हा शो होस्ट करतोय. पण याचं सगळंच श्रेय आहे सतीश राजवाडे सर, श्रीप्रसाद क्षीरसागर, सुमेध, चिन्मय, अद्वैत दादा, निखिल, दीप सर, स्टार प्रवाह, फ्रेम्स कंपनी आणि 'आता होऊदे धिंगाणा'च्या संपूर्ण टीमला जातं". 

"बापरे शब्दात मांडू शकणार नाही असा हा विषय आहे. पण येस, मी पण अशा एका कलाकृतीचा भाग आहे ज्यांनी शंभर एपिसोड पूर्ण केलेत आणि हे शक्य झाले तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे...सो थँक्यू . असंच प्रेम ठेवा आणि खूप भारी फिलिंग आहे. खरं सांगतो...खूप भारी फिलिंग आहे. लव यू ऑल...", असं म्हणत सिद्धार्थने प्रेक्षकांचेही आभार मानले आहेत. 

टॅग्स :सिद्धार्थ जाधवटिव्ही कलाकारस्टार प्रवाहमराठी अभिनेता