Join us

आशुतोष राणा पत्नी रेणुका शहाणेबद्दल म्हणतो, आम्ही दोन ध्रुवांवरची दोन टोकं!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 20:25 IST

अभिनेता आशुतोष राणा व अभिनेत्री रेणुका शहाणे हे बॉलिवूडच्या बेस्ट कपलपैकी एक आहे. गेल्या १७ वर्षांपासून दोघेही सुखाने नांदत आहेत. अगदी परस्पर विसंगत स्वभाव असतानाही. 

ठळक मुद्देहोय, अलीकडे एका इव्हेंटमध्ये आशुतोष यांनी स्वत:च हा खुलासा केला. मी आणि रेणुका दोघेही दोन ध्रुवांवरची दोन टोकं आहोत, असे आशुतोष यांनी सांगितले.

अभिनेता आशुतोष राणा व अभिनेत्री रेणुका शहाणे हे बॉलिवूडच्या बेस्ट कपलपैकी एक आहे. गेल्या १७ वर्षांपासून दोघेही सुखाने नांदत आहेत. अगदी परस्पर विसंगत स्वभाव असतानाही. होय, अलीकडे एका इव्हेंटमध्ये आशुतोषने स्वत:च हा खुलासा केला. मी आणि रेणुका दोघेही दोन ध्रुवांवरची दोन टोकं आहोत. ती आधुनिक तर मी पुर्णपणे गावरान. ती प्रत्येक बाबतीत अगदी परफेक्ट आणि मी बेफिकीर. कुणी तिला १० नंतर फोन केला तरी त्या व्यक्तिला थेट ब्लॉक करते आणि माझा दिवसचं मुळात रात्री १० नंतर सुरू होतो. माझे कवितेवर नितांत प्रेम आहे आणि तिला कविता हा प्रकार जराही आवडत नाही़, असे आशुतोषने सांगितले.लग्नापूर्वीही मी रेणुकाला रात्रीचं फोन करायचो. नशीब की माझा फोन ती आनंदाने घ्याायची. मग आम्ही दोन तीन तास गप्पा मारायचो. एकदा ती गोव्यात शूटींग करत असताना मी तिला एक कविता ऐकवली. ही कविता ऐकल्यानंतर राणाजी, मी तुमच्यावर प्रेम करते, असे रेणुका मला म्हणाली. यावर आपण भेटून बोलू, असे मी तिला म्हणालो. आज आमच्या लग्नाला १७ वर्षे झालीत, असे आशुतोषने सांगितले.कॉलेजच्या दिवसांतील काही आठवणीही  त्याने सांगितल्या. कॉलेजच्या दिवसांत मला पैज लावण्याची सवय होती. त्या काळात ट्रेनला एसीचे डब्बे नसायचे. आम्ही खिडक्यांना लटकून शेवटच्या डब्यापासून इंजिनपर्यंत पोहोचायचो. जो सर्वात आधी इंजिनपर्यंत पोहोचेल तो पैज जिंकायचा, असे त्याने सांगितले. अर्थात हे सांगताना आता कुणीही हे करू नये. कारण हे करणे चुकीचे आहे, हे सांगायला तो विसरला नाही . आज मला चित्रपटात असे काही करायला सांगितले तर मी थेट नकार देईल, असेही तो म्हणाला. रेणुका शहाणेआशुतोष राणा यांची भेट दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या एका चित्रपटादरम्यान झाली होती. गायिका राजेश्वरी सचदेव हिच्या माध्यमातून दोघेही एकमेकांना भेटले होते. आशुतोषसोबत लग्न करण्याच्या निर्णय घेताना रेणुका थोडी द्विधामनस्थितीत होती. पण आशुतोष लग्नाच्या निर्णयावर ठाम होता. पहिल्या भेटीनंतर सुमारे अडीच वर्षानंतर दोघांनीही लग्न केले. दोघांनाही दोन मुले आहेत.

टॅग्स :आशुतोष राणारेणुका शहाणे