Zanai Bhosle emotional post for Asha Bhosale: भारतीय संगीत क्षेत्रातील एक महान पर्व, सर्वांच्या लाडक्या आशाताई म्हणजे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. आशा भोसले यांच्यावर सोमवारी संध्याकाळी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. आशा भोसले यांची नात जनाई ही त्यांच्यासोबत मुंबईत राहायची. तिने आपल्या लाडक्या 'आशाई'च्या निधनानंतर एक भावनिक पोस्ट लिहिली.
जनाईने लिहिले, "आज सकाळी जेव्हा मला जाग आली, तेव्हा मला जाणीव झाली की मी माझा सर्वात मोठा आधार, माझी जिवलग मैत्रीण आणि मला जन्मानंतर सर्वात आधी कुशीत घेणारी व्यक्ती गमावली आहे. आता मी सकाळी उठल्यावर कोणाला मिठी मारणार? कोणासोबत चहा पिणार? माझ्या घरी येण्याची वाट कोण पाहणार? मी कुणासोबत हास्यविनोद करत गप्पा मारणार?" जनाईचे हे शब्द वाचताना कोणाचेही डोळे पाणावतील.
"आशा ताई या केवळ एक महान गायिका नव्हत्या, तर त्या 'जीवन' आणि 'हास्य' (Life and Laughter) यांची व्याख्या होत्या. जर तुम्हाला त्यांचे स्मरण करायचे असेल, तर केवळ त्यांच्या आनंदी रूपाचेच स्मरण करा. त्या आपल्या सर्वांकडे वरून बघत आहेत. त्यांनी मला वचन दिलं आहे की त्या माझ्याकडे पुन्हा परत येतील आणि मला घट्ट मिठी मारतील," असे तिने लिहिले.
"मी माझ्या आयुष्यातील सर्वात प्रेमळ व्यक्ती गमावली आहे. जगात यापेक्षा मोठे दुःख कुठलेही नाही. म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही तुमचे आयुष्य पुरेपूर जगा आणि आयुष्याचा उत्सव साजरा करा!! आशाई, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मी तुला तात्पुरतं 'बाय बाय' म्हणतेय पण मला माहित आहे की काहीही झाले तरी तू नेहमी माझ्यासोबत असणार आहेस. मी तुझ्या परत येण्याची आणि मला पुन्हा एकदा मिठी मारण्याची वाट पाहत राहिन," अशा शब्दांत तिने आपल्या भावनांना वाट करून दिली. तसेच तिने एक व्हिडिओ देखील शेअर केला असून, तो त्यांच्यातील एका वैयक्तिक विनोदावर आधारित असल्याचे सांगितले आहे.
Web Summary : Zanai Bhosle, granddaughter of Asha Bhosle, shared a touching post after her grandmother's passing, recalling cherished moments and expressing deep love and longing for their reunion.
Web Summary : आशा भोसले की पोती जनाई ने अपनी दादी के निधन के बाद एक भावुक पोस्ट साझा किया, जिसमें उन्होंने यादगार पलों को याद किया और उनके पुनर्मिलन के लिए गहरा प्यार और लालसा व्यक्त की।