Join us

आर्या आंबेकरचं चाहत्यांना चॅलेंज, ३१ दिवसांसाठी घेतला महत्वाचा निर्णय, काय आहे तिची पोस्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 10:26 IST

नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी फक्त ३१ दिवस शिल्लक राहिले आहेत.

'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम आर्या आंबेकर (Arya Ambekar) सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. आर्याचा गोड आवाज तर चाहत्यांना प्रेमात पाडतोच पण तिने आपल्या सौंदर्यानेही भुरळ घातली आहे. 'ब्युटी विथ ब्रेन' असं तिच्याबद्दल म्हटलं जातं. नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी फक्त ३१ दिवस शिल्लक राहिले आहेत. या ३१ दिवसांसाठी आर्याने महत्वाचा निर्णय घेतला आहे. काय आहे तो निर्णय?

आर्याने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले,'सर्वांसोबत एक गोष्ट शेअर करायची आहे. बघता बघता डिसेंबर महिना सुरु झाला आणि नवीन वर्ष सुरु होण्यासाठी फक्त ३१ दिवस राहिलेत. या वेळात मी स्वत:ला सोशल मीडियापासून दूर ठेवणार आहे आणि इतर गोष्टींना प्राधान्य देणार आहे. आपल्या आयुष्यात आजुबाजुला सतत डिजिटल गोंधळ सुरु असतो. त्यापेक्षा हे ३१ दिवस मन:शांतीसाठी वैयक्तिक ध्येयाकडे लक्ष देण्यासाठी, मूल्य, नाती सांभाळण्यासाठी आणि एक चांगला माणूस होण्याकडे लक्ष देऊया. तुम्हीही माझ्यासोबत हे आव्हान स्वीकाराल का?

आर्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही कमेंट करत सहमती दर्शवली आहे.'एका इंन्फ्लुएन्सने खरंतर हेच करणं गरजेचं आहे' अशी कमेंट एकाने केली आहे. आर्या नेहमीच तिच्या साधेपणाने चाहत्यांचं मन जिंकते. तिच्या या चॅलेंजलाही चाहते प्रतिसाद देत आहेत.

टॅग्स :आर्या आंबेकरसोशल मीडियासा रे ग म पमराठी गाणीमराठी अभिनेता