Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आर्टिकल ३७०' हिट होताच अभिनेत्रीने घेतली Mercedes, किंमत ऐकून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 14:21 IST

'आर्टिकल ३७० 'सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर आता प्रिया मणीने एक गुडन्यूज दिली आहे. सिनेमाच्या सक्सेसनंतर प्रिया मणीने मर्सिडिज कार खरेदी केली आहे.

सु्प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणी सध्या तिच्या 'आर्टिकल ३७०' सिनेमामुळे चर्चेत आहे. यामी गौतम मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर गाजत आहे. या सिनेमातून काश्मीरमधून हटवण्यात आलेल्या 'कलम ३७०' या ऐतिहासिक निर्णयाची गोष्ट सांगण्यात आली आहे. या सिनेमात प्रिया मणीने  PMO ऑफिसमधील सेक्रेटरीची भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. 'आर्टिकल ३७० 'सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर आता प्रिया मणीने एक गुडन्यूज दिली आहे. 

सिनेमाच्या सक्सेसनंतर प्रिया मणीने मर्सिडिज कार खरेदी केली आहे. प्रिया मणीने पांढऱ्या रंगाची मर्सिडीज बेन्झ जीएलसी ही नवी कोरी गाडी घरी आणली आहे. या गाडीची किंमत सुमारे ७४ लाखांच्या घरात आहे. मर्सिडीज ही जगातील सगळ्यात महागड्या कारपैकी एक आहे. अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि सेलिब्रिटी मर्सिडीजचे चाहते आहेत. आता प्रिया मणीदेखील मर्सिडीज कारची मालकीण झाली आहे. 

दरम्यान, 'आर्टिकल ३७०' आधी प्रिया मणी शाहरुख खानच्या जवान सिनेमात झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. प्रिया मणीने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'फॅमिली मॅन' या सीरिजमध्येही ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. 

टॅग्स :सेलिब्रिटीमर्सिडीज बेन्झ