Join us
Daily Top 2Weekly Top 5

हा अभिनेता गुणगुणतोय, कोणी तरी येणार येणार गं, सोशल मीडियावर दिली 'गुड न्यूज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 17:17 IST

मांमध्ये तो सहभागी झाला आहे. दिव्यांगांसाठीही तो काम करतो.

कुणी तरी येणार येणार गं…. या गाण्याच्या ओळी सध्या एका अभिनेत्याच्या घरातून ऐकायला मिळत आहेत. कारण लवकरच त्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. हा अभिनेता आहे आरोह वेलणकर. सध्या अंकिता आणि आरोह  दोघांच्याही आनंदाला उधाण आलंय.  आरोह सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह कनेक्ट असतो. आरोहने अंकिता शिंगवीसह लग्न केले आहे. 

महाबळेश्वरमध्ये आरोह आणि अंकिताचे डेस्टिनेशन वेडिंग पार पडले होते. नेहमीच सोशल मीडियावर आरोह आणि अंकिताचा रोमँटिक अंदाज, त्यांच्यातील केमिस्ट्री पाहायला मिळते. या दोघांच्या फोटोंना चाहतेदेखील तुफान पंसती देत असतात.अंकिताही पुण्याची असून तिचा चित्रपटसृष्टी आणि अभिनयाशी संबंध नाही. आरोहने डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत आपला आनंद चाहत्यांसह शेअर केला आहे. सध्या अंकिता आणि आरोह दोघेही बाळाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. 

बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतलेला आरोह वेलणकरने सगळे टास्क बेधडकपणे खेळला होता.समोरची व्यक्ती ही केवळ त्याच्यासाठी प्रतिस्पर्धी असते. भावना बाजूला ठेऊन केवळ टास्क जिंकण्याकडे त्याचे लक्ष होते. टास्क खेळताना त्याने कधीच बळाचा वापर केला नाही. प्रत्येक टास्क तो बुद्धिचातुर्याने खेळल्यामुळे त्याचे कौतुक झाले होते.

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी असलेल्या मुख्यमंत्री मदतनिधीसाठी त्याने 1 लाख रूपयांचा मदतनिधी दिला होता. मुख्यमत्र्यांच्या कार्यालयातून आरोहच्या ह्या स्तुत्य उपक्रमासाठी ट्विटही करण्यात आले होते.  “माझा सामाजिक कार्य करण्याकडे पूर्वीपासूनच कल असल्याने मी अशी मदत एरवी नेहमी करत असतो. त्याविषयी बोलायला मला जास्त आवडत नाही. पण ह्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानेच याविषयी ट्विट केले होते असे आरोहने सांगितले होते..”

आरोह अनेक सामाजिक संस्थांबरोबर संलग्न आहे. 'आय व्होट' सारख्या वेगवेगळ्या जनजागृती मोहिमांमध्ये तो सहभागी झाला आहे. दिव्यांगांसाठीही तो काम करतो.

टॅग्स :आरोह वेलणकर