Join us

अरिजीत सिंहची तब्येत बिघडली, ऑगस्ट महिन्यातील सर्व लाईव्ह कॉन्सर्ट केले स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 09:53 IST

अरिजीतने सोशल मीडियावर केली पोस्ट

'आशिकी 2' मधील 'तुम ही हो' गाण्यानंतर तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेला अभिनेता अरिजीत सिंह (Arijit Singh). त्याचे जगभरात असंख्य चाहते आहेत. अरिजीतचं प्रत्येक गाणं आज हिट आहे. त्याचा सुरेल आवाज, आवाजातली निरागसता चाहत्यांच्या मनाला भिडते. दरम्यान अरिजीतने नुकतंच त्याची तब्येत बिघडली असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्याचे सर्व लाईव्ह कॉन्सर्ट्सही पुढे ढकलण्यात आले आहेत. 

अरिजीत सिंहने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. त्याने लिहिले, 'प्रिय चाहत्यांनो, मला हे सांगताना दु:ख होत आहे की मला अचानक मेडिकल ट्रीटमेंटची गरज भासली आहे. ज्यामुळे मला ऑगस्टमधील कॉन्सर्ट स्थगित कराव्या लागत आहेत. मला माहित आहे की तुम्ही या शोची आतुरतेने वाट पाहत होतात आणि त्यासाठी मी मनापासून माफी मागतो. तुमचं प्रेम आणि पाठिंबा मला बळ देतं. चला या विश्रांतीनंतर जी कॉन्सर्ट होईल ती आणखी जादुई असेल असं मी आश्वासन देतो. नवीन तारखा घोषित केल्या आहेत. मला समजून घेतल्याबद्दल तुमचे आभार. पुन्हा तुमच्यासोबत आठवणी बनवण्यासाठी मी आणखी प्रतिक्षा करु शकत नाही. मनापासून क्षमा मागतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो."

अरिजीत सिंहचे परदेशात लंडनसह आणखी काही ठिकाणी कॉन्सर्ट होणार होते जे आता स्थगित करण्यात आले आहेत. तब्येतीच्या कारणामुळे त्याचे शो पुढे ढकलण्यात आले आहेत. आता सप्टेंबर महिन्यात तो परफॉर्म करणार आहे. सर्व चाहते त्याला 'लवकर बरा हो' म्हणत आहेत. 

अरिजीत सिंह सध्या भारतातला नंबर 1 चा गायक आहे. लाखो रुपयांना त्याच्या कॉन्सर्टची तिकीट विक्री होते. तसंच सिनेमांमधील गाण्यांसाठीही तो बरेच पैसे घेतो. सध्याच्या काळातला तो सर्वात महागडा गायक आहे.

 

टॅग्स :अरिजीत सिंहबॉलिवूडवैद्यकीयसंगीत