Join us
Daily Top 2Weekly Top 5

सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 18:29 IST

एकदा एका एपिसोडचं शूटिंग करत असताना सासूच्या मृत्यूची बातमी मिळाली.

अर्चना पूरण सिंह मनोरंजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि २०१९ पासून 'द कपिल शर्मा शो' मध्ये जज म्हणून दिसत असून सर्वांची मनं जिंकत आहे. अर्चना यांचं हसणं हे कपिल शर्माच्या कॉमेडी शोचं एक मुख्य आकर्षण आहे आणि वेळोवेळी अभिनेत्रीने याबद्दल सांगितलं आहे. अर्चना यांनी पुन्हा एकदा खुलासा केला की, त्यांच्या आयुष्यातील खास व्यक्तीला गमावल्यानंतरही शोमध्ये हसावं लागलं होतं.

अर्चना यांनी इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत कपिल शर्मा शोमधील त्यांच्या भूमिकेबद्दल सांगितलं. एकदा त्या एका एपिसोडचं शूटिंग करत असताना त्यांना सासूच्या मृत्यूची बातमी मिळाली. अर्चना यांनी सांगितलं की, मेकर्सना सांगितलं होतं की, त्यांना घरी जायचं आहे. पण तेव्हा एपिसोड पूर्ण झालेला नव्हता. म्हणूनच मेकर्सनी त्यांना काही हसणारे शॉट्स देण्यास सांगितलं जेणेकरुन ते एपिसोडमध्ये जिथे आवश्यक असेल तिथे जोडू शकतील.

अर्चना यांनी शेअर केलं की, त्या फक्त शॉट्ससाठी बसल्या होत्या आणि आपल्या घरामध्ये आता काय चाललं असेल याचा विचार करत होत्या. जेव्हा होस्टने विचारलं की, त्या परिस्थितीत त्या नेमक्या कशा हसल्या? यावर अर्चना यांनी सांगितलं की, इंडस्ट्रीमध्ये ३०-४० वर्षे राहिल्यानंतर, एखाद्याला हे समजून घेणं आवश्यक आहे की, कोणीही आपलं काम अर्धवट सोडू शकत नाही. कारण निर्मात्याने देखील प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केली आहे.

अर्चना पूरण सिंह यांनी सांगितलं की, त्यांचे पती परमीत सेठी यांनाही परिस्थिती समजली, मात्र त्यांना हे नेमकं काय सुरू आहे हे समजण्यास १५ मिनिटं लागली. त्या पूर्णपणे ब्लँक होत्या आणि मनामध्ये फक्त शॉट्स, सासूचा मृत्यू आणि त्याबाबतचे विचार सुरू होते. परिस्थिती इतकी दुःखी होती की या हृदयद्रावक बातमीनंतर ही मी मोठमोठ्याने हसायला लागल्या. 

टॅग्स :अर्चना पूरण सिंगकपिल शर्मा टिव्ही कलाकार