Join us  

अरबाजची पत्नी शुरा खानची अजब 'वॉकिंग स्टाईल', मलायकाशी तुलना करत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 2:05 PM

शूरा खान अरबाजपेक्षा 25 वर्षांनी लहान आहे. त्यांच्यातील वयाच्या फरकामुळे त्यांना ट्रोलही केलं जातं.

अरबाज खान (Arbaaz Khan) आणि पत्नी शुरा (Sshura Khan) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. या newly married कपलचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. कधी दोघंही रोमँटिक डेटवर जातात तर कधी गर्दीत अरबाज पत्नीची काळजी घेताना दिसतो. शूरा खान अरबाजपेक्षा 25 वर्षांनी लहान आहे. त्यांच्यातील वयाच्या फरकामुळे त्यांना ट्रोलही केलं जातं. तर शूरा सुद्धा बरेचदा नेटकऱ्यांकडून ट्रोल होते. आता काय तर ती तिच्या चालण्याच्या अजब स्टाईलमुळे ट्रोल होत आहे.

अरबाज आणि शूरा दोघांना नुकतंच इफ्तार पार्टीसाठी एकत्र आले. मोहम्मद अली रोडवर त्यांनी रोजामधील प्रसिद्ध पक्वान्नांचा आस्वाद घेतला. त्यांचा क्युट बाँड बघून चाहत्यांनी कौतुकही केलं. पण आता शुरा खानचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये शूरा कॅमेऱ्यासमोर अजिबातच कम्फर्टेबल दिसत नाही. तिने जीन्स आणि शर्ट असा कॅज्युअल आऊटफिट घातले आहे. तिचा लूक तर चाहत्यांना आवडलाय मात्र तिची चालण्याची स्टाईल पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय.

शूराच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लिहिले, 'अगं अशी का चालतेय?','मलायका अरोरासारखं चालण्याचा प्रयत्न करतेय का?','. शूराची सतत मलायका अरोराशी तुलना करत तिला ट्रोल केले जाते. शूरा खान ही आधी मेकअप आर्टिस्ट होती. रवीना टंडनचं ती काम करायची. रवीनाच्याच एका सिनेमावेळी अरबाज आणि शूराची ओळख झाली, तेव्हा अरबाज तिला रवीनाच्या मेकअपविषयी सूचना द्यायचा. मात्र नंतर दोघांची सतत भेट व्हायला लागली आणि नंतर ते प्रेमात पडले. 

टॅग्स :अरबाज खानट्रोलसोशल मीडिया