Join us  

लेकाच्या शोमध्ये अरबाजने उडवली मलायकाबरोबरच्या घटस्फोटाची खिल्ली, म्हणाला, "माझ्या लग्नात..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 2:52 PM

अरबाज आणि सोहेल खानने अरहानच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये अरबाजने घटस्फोटाबद्दल भाष्य केलं.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान लग्नाच्या १९ वर्षांनी घटस्फोट घेत २०१७मध्ये वेगळे झाले. पण, घटस्फोटानंतरही अरबाज आणि मलायका कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मलायका आणि अरबाजचा लेक अरहान खानने डंब बिरयानी हा शो सुरू केला आहे. या शोमध्ये हजेरी लावत मलायकाने लेकाच्या प्रश्नांना उत्तरं दिली होती. लग्नाच्या प्लॅन्सपासून ते एक्स पती अरबाज खानबद्दल मलायकाने अनेक गोष्टींचा खुलासा केला.  या शोमध्ये अरबाज खान आणि सोहेल खाननेही हजेरी लावली होती. 

अरबाजने लेकाच्या शोमध्ये मलायकाबरोबर झालेल्या घटस्फोटाची खिल्ली उडवली. याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अरबाज म्हणतो, "जेव्हा आम्ही तरुण होतो तेव्हा सगळे एकत्र राहत होतो." पुढे सलमानचं नाव न घेता म्हणतो की  एक व्यक्ती सोडून आम्हा सगळ्यांचं लग्न झालं. त्यानंतर मलायकाबरोबरच्या घटस्फोटावरही तो भाष्य करताना दिसत आहे. "लग्नानंतर आम्ही वेगळेही झालो", असं सोहेलकडे बघून तो हसत म्हणतो. त्यानंतर अरहान त्याला अभिनंदन असं म्हणताच सगळेच हसायला लागतात. 

"मग मी पुन्हा लग्न केलं", असं अरबाज पुढे म्हणतो. त्यावर अरहान त्याला माझ्या मित्राने लग्न मिस केल्याचं म्हणतो. त्यावर अरबाज म्हणतो, "अरहानचा मित्र मला म्हणाला की तुमच्या लग्नाला मी येऊ शकलो नाही. तर मी त्याला म्हणालो की काही नाही पुढच्या लग्नाला ये". 

मलायका आणि अरबाज खानने १९९८ मध्ये लग्न करत संसार थाटला होता. सुखी संसाराच्या तब्बल १९ वर्षांनी २०१७मध्ये ते घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना अरहान हा मुलगा आहे. घटस्फोटानंतरही मलायका आणि अरबाज चर्चेत असतात. घटस्फोटानंतर दोघांनीही त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सध्या मलायका अभिनेता अर्जुन कपूरबरोबर रिलेशवशिपमध्ये आहे. तर अरबाजने काही महिन्यांपूर्वीच शूराशी निकाह करत नव्याने संसार थाटला आहे.

टॅग्स :अरबाज खानमलायका अरोरा