Join us

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये दिसणार सर्वांची लाडकी ‘शेवंता’? नवा प्रोमो पाहून चाहते क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 13:58 IST

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये यावेळी कोण कोण स्पर्धक असणार? हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. अशात एका नावाची जोरदार चर्चा आहे आणि नवा प्रोमो पाहून लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन (Bigg Boss Marathi 4 ) उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. उद्या बिग बॉस मराठी 4 चा ग्रँड प्रीमिअर रंगणार आहे. हा प्रीमिअर किती ग्रँड असणार याची झलक तुम्ही प्रोमोमध्ये पाहू शकतात. ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये यावेळी कोण कोण स्पर्धक असणार? हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. अशात एका नावाची जोरदार चर्चा आहे आणि नवा प्रोमो पाहून लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कलर्स मराठीने एक नवा प्रोमो शेअर केला आहे. यात स्पर्धकाचा चेहरा दिसत नाही. प्रोमोत एक अभिनेत्री दिलखेचक नृत्य करताना दिसतेय. ‘गंगुबाई’ चित्रपटातील ‘ढोलीडा’ या गाण्यावर ती थिरकताना दिसतेय. ‘लाखों दिलाची धडकन येतेय बिग बॉस मराठीच्या मंचावर,’ असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. प्रोमोत चेहरा दिसत नसला तरी प्रेक्षकांच्या मते, ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून सर्वांची लाडकी ‘शेवंता’ अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar ) आहे. 

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत अपूर्वाने साकारलेली शेवंता ही भूमिका तुफान गाजली. सगळेच तिच्या प्रेमात पडले. काही मतभेदांमुळे अपूर्वाने ही मालिका सोडली. तेव्हापासून ती फार कुठे झळकलेली नाही. ही अपूर्वा बिग बॉस मराठीच्या घरात जाणार अशी चर्चा आहे.  प्रोमोमध्ये दिसणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच आहे असा दावा अनेक प्रेक्षकांनी केला आहे.आता अपूर्वा खरंच बिग बॉस मराठीच्या घरात जाणार की प्रेक्षकांचा हा अंदाज चुकणार? याचं उत्तर तुम्हाला उद्याच मिळू शकेल.

 ‘बिग बॉस मराठी 4’ हा शो नेहमीप्रमाणे महेश मांजरेकर होस्ट करत आहेत.   ‘ऑल  इज वेल’ या सीझनची थीम आहे. उद्या 2  आॅक्टोबरपासून ‘बिग बॉस मराठी 4’ सुरू होणार असल्याने प्रेक्षक क्रेझी झाले आहेत.

टॅग्स :बिग बॉस मराठीअपूर्वा नेमळेकरमहेश मांजरेकर मराठी अभिनेता