Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये अडकलेली शेवंता करतेय या गोष्टी, जाणून घ्या त्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 13:38 IST

सेलिब्रेटींनी स्वत: ला क्वारांटाईन करुन घेतले आहे.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी पूर्णपणे लॉकडाउन केले आहे. यामुळे सेलिब्रेटींनी स्वत: ला क्वारांटाईन करुन घेतले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या फॅन्सच्या संपर्कात आहेत. 

रात्रीस खेळ चाले मालिकेतून घराघरात पोहोचलेली शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर हिने सुद्धा स्वत:ला क्वारांटाईन करुन घेतले आहे. शूटिंग बंद असल्यामुळे अपूर्वा कुटुंबीयांसोबत वेळ घालवते आहे आणि तिचे वेगवेगळे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करते आहे. पाणी पुरी बनवल्यानंतर अपूर्वाने तिचा मोर्चा वळवला आहे ते गाजरच्या हलव्याकडे. अपूर्वाने गाजराचा हलवा तयार करतानाचा किचनमधला व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर हलवा तयार झाल्यावर त्यासोबतचा फोटो देखील तिने शेअर केला आहे. अपूर्वाच्या फोटो आणि व्हिडीओला चाहत्यांनी चांगलीच पसंती दाखवली आहे. 

'रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने जशी प्रेक्षकांची मनं जिंकलीत, तसेच या मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. शेवंता आणि अण्णांच्या अदाकारीचे तर चाहते डाय हार्ट फॅन बनलेत.

या मालिकेतून लोकप्रियता मिळाल्यानंतर अपूर्वाच्या चाहत्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. दादर येथे जन्मलेल्या अपूर्वाने किंग जॉज विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर नॅशनल कॉलेज वांद्रे आणि रूपारेल कॉलेजात तिचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले आहे. रात्रीस खेळ चाले मालिकेच्या आधीसुद्धा अनेक मालिकांमध्ये तिने काम केले आहे.

टॅग्स :अपूर्वा नेमळेकररात्रीस खेळ चालेझी मराठी