Join us  

टायगर श्राफनं खिलाडी कुमार अक्षयला कसं बनवलं एप्रिल फूल, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 1:53 PM

फक्त सामान्य नागरिकच नाही तर याबाबतीत आपले बॉलिवूड सेलिब्रेटीही मागे नाहीत.

एप्रिल फूल बनाया… 1 एप्रिलला प्रत्येकाच्या तोंडून हे ऐकायला मिळेल. दरवर्षी 'एप्रिल फूल डे' जगभरात 1 एप्रिल रोजी साजरा केला जातो. या दिवशी लोक त्यांच्या प्रिय व्यक्तींना किंवा जवळच्या व्यक्तींना एप्रिल फूल बनवतात. या दिवशी लोक एकमेकांना मूर्ख बनवून खूप मजा करतात.  फक्त सामान्य नागरिकच नाही तर याबाबतीत आपले बॉलिवूड सेलिब्रेटीही मागे नाहीत. अभिनेता टायगर श्रॉफनं खिलाडी कुमार अक्षयला 'एप्रिल फूल' बनवलं. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

टायगर श्रॉफने  पूर्ण नियोजन करून खिलाडी कुमारला मुर्ख बनवल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.  व्हिडीओमध्ये दिसून येत की, टायगर श्रॉफ आणि अक्षय हे त्यांच्या मित्रासोबत गेम खेळणार असतात. तेवढ्यात अक्षयच्या नकळत टायगर हा कोकची बाटली जोरात हलवून ठेवतो. अक्षय येताच त्याला बॉटलचं झाकन उघडून देण्याची विनंती करतो आणि अक्षय जसं बॉटलचे झाकन काढतो तसं सुंपर्ण कोक एकदम त्याच्या तोंडावर उडतो. हे पाहून टायगर आणि इतर काही जण एप्रिल फूल बनाया असं म्हणत हसतात".

टायगर श्रॉफने त्याच्या सोशल मीडियावर हा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. "एप्रिल फूल बडे मियाँ" असं कॅप्शन त्यानं दिलं. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट आणि लाईक्स केल्या आहेत. अक्षय आणि टायगर सध्या त्यांच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट रिलीज होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. अली अब्बास जफरच्या दिग्दर्शनात बनलेला हा सिनेमा ॲक्शनसोबतच कॉमेडीही असणार आहे. येत्या 10 एप्रिल 2024 रोजी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारसेलिब्रिटीबॉलिवूडटायगर श्रॉफएप्रिल फूल