Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अंगारो सा' गाण्यावर अप्पीबरोबर थिरकला सिंबा, डान्स पाहून चिमुकल्याचं कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 15:21 IST

'अंगारो सा' आणि  'एक लाजरान साजरा मुखडा' या फ्युजन गाण्यावर अप्पी आणि सिंबा डान्स करताना दिसत आहेत. अप्पीला सिंबानेही उत्तम साथ दिल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

अल्लू अर्जुन मुख्या भूमिकेत असलेल्या 'पुष्पा' सिनेमाच्या सीक्वलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाचा दुसरा भाग 'पुष्पा २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पुष्पा २' प्रदर्शित होण्याआधीच त्यातील गाण्यांनी चाहत्यांना वेड लावलं आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील 'अंगारो सा' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं. पुष्पा आणि श्रीवल्लीच्या या गाण्याने प्रदर्शित होताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या गाण्याची सर्वत्र क्रेझ पाहायला मिळत आहे. आता अप्पी आणि सिंबानेही या गाण्यावर डान्स केला आहे. 

'अप्पी आमची कलेक्टर' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील अपर्णा हे पात्र साकारणारी अभिनेत्री शिवानी नाईक हिने छोट्या सिंबासोबत पुष्पा आणि श्रीवल्लीच्या गाण्यावर डान्स केला आहे. 'अंगारो सा' आणि  'एक लाजरान साजरा मुखडा' या फ्युजन गाण्यावर अप्पी आणि सिंबा डान्स करताना दिसत आहेत. अप्पीला सिंबानेही उत्तम साथ दिल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यांच्या या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

काही दिवसांपूर्वीच 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत सिंबा म्हणजे अमोल हे पात्र साकारणाऱ्या बालकलाकार गणेश केंद्रे याची एन्ट्री झाली. आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यामुळे गणेश प्रसिद्धीझोतात आला होता. आता लडीवाळ अभिनयाने तो प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे. सध्या 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका रंजक वळणावर असून मालिकेत अमोल अप्पी आणि अर्जुनला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे. आईवडिलांना एकत्र आणण्याचा त्याचा मास्टरप्लॅन यशस्वी ठरेल का? हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.  

टॅग्स :टिव्ही कलाकारपुष्पाझी मराठी