Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आप्पाचा विषय लय हार्ड ए" या रातोरात प्रसिद्ध झालेल्या गाण्याचा गीतकार कोण माहितेय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 15:55 IST

सध्या नेटकरी हे  "आप्पाचा विषय लय हार्ड ए" वर रील्स करताना दिसत आहेत.  रातोरात हे गाणे लोकप्रिय झालं आहे.  पण, या गाण्याचा गीतकार कोण हे तुम्हाला माहितेय का? तर ते आपण जाणून घेऊया. 

Appa Cha Vishay Lay Hard Hai : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. रील्समध्ये ट्रेंड असतो. जे काही ट्रेंड होतं त्यावर भरभरून रील्स बनवले जातात आणि जे लाखो वेळा पाहिले जातात. 'गुबाली साडी' आणि  'चिन टपाक डम डम' नंतर सोशल मीडियावर एकाच गाण्याची चर्चा आहे.  ते म्हणजे "आप्पाचा विषय लय हार्ड ए". प्रत्येकाच्या तोंडी हे गाणं आहे.  नेटकरी हे  "आप्पाचा विषय लय हार्ड ए" वर रील्स करताना दिसत आहेत.  रातोरात हे गाणे लोकप्रिय झालं आहे.  पण, या गाण्याचा गीतकार कोण हे तुम्हाला माहितेय का? तर ते आपण जाणून घेऊया. 

इन्स्टा असो वा फेसबुक सगळीकडे "आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाचं घरात नाय ध्यान पण आप्पाचं बाहेर लय लाड आहे" या गाण्याचे रील्स बघायला मिळत आहेत. अनेक रील्समध्ये या गाण्याचा वापर केला जात आहे. हे गाणे 'वरदान' नावाच्या इन्स्टाग्राम आणि युट्यूब चॅनेलवर हे रिलीज करण्यात आलं आहे. हे एक रॅप गाणे आहे. जे लोकांना फारचं आवडलं आहे. 

ऋषी भोसले नावाच्या एका कलाकारानं हे गाणे तयार केलं आहे.  लहानांपासून ते वृद्धांपर्यंत  "आप्पाचा विषय लय हार्ड ए" या ट्रेंडिंग गाण्यांवर व्हिडीओ बनविल्याशिवाय राहवत नाहीये. एक महिन्यात या गाण्याला १ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. या गाण्याचं खूप कौतुक होत आहे. गाण्याला एवढं प्रेम मिळालेलं पाहून ऋषी भोसलेनं त्याच्या इन्स्टाग्रावर व्हिडीओ शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत.  ऋषी भोसले यांनं याआधी देखील अनेक रॅप साँग बनवले. पण आप्पाचा विषय लय हार्ड आहे हे त्याचं रॅप चांगलंच हिट झालं आहे.

टॅग्स :सोशल मीडियासेलिब्रिटीयु ट्यूब