महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु असून, गणेशभक्त बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतायेत. गणेश चतुर्थी उद्या 19 सप्टेंबरला आहे. सेलिब्रिटींनी आपल्या घरी गणपती बाप्पा आणण्यास सुरुवात केली आहे. यात अभिनेत्री अनुष्का शर्मानेही आपल्या घरी गणपती बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. आपल्या तयारीचा एक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
अनुष्का शर्मा देखील बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. अनुष्काने एक मिरर सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये अनुष्काने लिहलं की, "जेव्हा गणपती बाप्पासाठी तुम्हाला घरातील संपूर्ण फर्निचर शिफ्ट करायचं असतं, तेव्हा जिम ही एकमेव जागा असते. जिथे तुम्ही सगळ्या वस्तू ठेऊ शकता".
मुलगी वामिकाचा जन्म झाल्यानंतर अनुष्काने काही काळासाठी सिनेविश्वातून ब्रेक घेतला होता. मात्र, आता लवकरच झुलन गोस्वामीच्या बायोपिकच्या माध्यमातून अनुष्का प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी ती खूप मेहनत घेत आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.