Join us

B'day Special: एखाद्या सिनेमाच्या कथेला शोभेल अशी अनुष्का-विराटची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 10:51 IST

आज अनुष्का तिचा 30वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांची लव्हस्टोरी...

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्स यांचं नातं अनेक वर्षांपासून आहे. कितीतरी बॉलिवूड अभिनेत्रींनी क्रिकेटर्ससोबत लग्न केलंय. अनेकांच्या लव्हस्टोरी गाजल्या. पण सर्वात जास्त खास ठरलं आणि चर्चेत राहिली ती अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची लव्हस्टोरी. विराट आणि अनुष्का यांचं अफेअर होतं आणि त्यांनी लग्न केलं हे सर्वांनाच माहीत आहे. पण त्यांची पूर्ण लव्हस्टोरी फार कमी लोकांना माहीत आहे. आज अनुष्का तिचा 30वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांची लव्हस्टोरी...

2013 मध्ये सुरु झाली होती लव्हस्टोरी

अनुष्का आणि विराटची लव्हस्टोरी 2013 मध्ये सुरु झाली होती. यशाच्या शिखरावर असलेल्या अनुष्का आणि विराटला एका कंपनीने जाहीरातीसाठी एकत्र कास्ट केलं होतं. असे म्हणतात की, दोघांची मैत्री इथूनच सुरु झाली. पुढे हीच मैत्री हळूहळू प्रेमात रुपांतरित झाली. तेव्हापासून दोघांच्या प्रेमाचे किस्से रंगू लागले. या दोघांचं अफेअर आहे यावर शिक्कामोर्तब तेव्हा झालं जेव्हा जानेवारी 2014 मध्ये साऊथ आफ्रिका दौरा संपवून विराट एअरपोर्टवरुन थेट अनुष्काच्या घरी गेला. त्यावेळी काही न बोलता सर्वांना ही बातमी कळाली.  

विराटने मैदानात केले प्रेम जाहीर

2014 मध्ये झालेल्या त्या दौऱ्यानंतर दोघे अनेक ठिकाणी एकत्र बघायला मिळाले. फेब्रुवारी महिन्यात अनुष्का विराटला भेटण्यासाठी न्यूझीलंडला गेली. त्यानंतर विराटही अनुष्काला भेटण्यासाठी पीके सिनेमाच्या शूटिंगवेळी अनुष्काचा 26 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी उदयपुरला पोहोचला होता. हे ते कुणापासूनही लपवू शकले नाही. 2014 मध्ये सामन्यावेळी विराटने अनुष्काकडे किसचा इशारा केला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

(B'DAY SPL: जेव्हा या गोष्टीवरुन अनुष्कासमोर ढसाढसा रडला होता विराट)

ब्रेकअपची चर्चा

2016 मध्ये दोघांच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा झाली. त्यावेळी दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं होतं. त्यानंतर दोघांमध्ये काहीतरी बिनसलं अशी चर्चा झाली. इतकेच काय तर दोघांना त्यावर विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी उत्तरे देणे टाळले. दरम्यान सुल्तानच्या सक्सेस पार्टीत दोघे सोबत दिसले. ही पार्टी सलमान खानने दिली होती. पुन्हा दोघे एकत्र आल्याची चर्चा सुरु झाली. 

विराटने घेतली ट्रोलर्सची शाळा

असे म्हणतात की, विराटवर दोघांच्या ब्रेकअपमुळे वाईट परिणाम दिसत होता. तो चांगलं चांगलं प्रदर्शन करु शकत नव्हता. त्याच्या वाईट प्रदर्शनावर सोशल मीडियात अनुष्काला ट्रोल केलं जायचं. हे इतकं वाढलं की, विराटला एक शेम या टायटलखाली एक पोस्ट लिहावी लागली. त्यात त्याने ट्रोलर्सला चांगलेच धारेवर धरले होते. 

2017 मध्ये प्रेमाला दिलं नात्याचं नाव

डिसेंबर 2017 मध्ये अनुष्काने विराटसोबत लग्न केलं. दोघेही आता सुखाचा संसार करत आहे. 

टॅग्स :अनुष्का शर्माबॉलिवूड