Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुराग शर्मा आणि आरती सिंग 'उडान' मालिकेत करणार प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 16:19 IST

आगामी एपिसोड मध्ये एक महत्वाची कलाटणी येणार आहे आणि त्यात शोमध्ये आरती सिंग आणि अनुराग शर्मा अंजोर आणि चकोर यांच्या मधील संबंध बदलणारी जोडी, श्री. व सौ. श्रॉफ यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

छोट्या पडद्यावरील 'उडान' मालिकेने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले आहे. नुकतेच या शोमध्ये 'चकोर' (मीरा देवस्थळे) आणि राघव (विजयेंद्र कुमेरिया) यांच्या आयुष्यात अनेक अडथळे आल्याचे आणि त्या वादळाचा सामना त्यांनी हिंमतीने कसा केला हे पहायला मिळाले आहे. आगामी एपिसोड मध्ये एक महत्वाची कलाटणी येणार आहे आणि त्यात शोमध्ये आरती सिंग आणि अनुराग शर्मा अंजोर आणि चकोर यांच्या मधील संबंध बदलणारी जोडी, श्री. व सौ. श्रॉफ यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

सध्या, अंजोरला वाटत आहे की तिची आई चकोर आणि राघव यांचे लग्न झालेले आहे. पण, वास्तव वेगळे आहे कारण चकोरने राघवला तिच्या आणि तिच्या कुटुंबा पासून लांब राहण्याची विनंती केली आहे. तिच्या मुलीकडे पळत जात असताना, घटनांच्या अनाकलनीय कलाटणींमध्ये चकोर एका खूनामध्ये गुंतली जाते आणि ती मुख्य संशयित बनते.

तेजस्वी भूमिका आणि ठळक संवादासाठी प्रसिध्द असलेले अनुराग शर्मा जतीन श्रॉफची भूमिका साकारत आहेत. ते एक आदरणीय, प्रेमळ कौटुंबिक व्यक्ती असून त्यांना लहान अंजोरशी मजबूत बंध आहे असे वाटते. आरती सिंग जतीनच्या पत्नीची पूनम श्रॉफची भूमिका करत आहे. बाळ होऊ न शकलेल्या या जोडप्याला अंजोर नशीबाने भेटते आणि त्यांना तिच्याशी काही नाते आहे असे वाटते. कठीण परिस्थितीला तोंड देत त्यांना अंजोरमध्ये त्यांचा आनंद सापडतो आणि  म्हणून श्रॉफ दांपत्य तिचे जोपासना पालक बनण्याचे ठरवतात.

अनुराग शर्मांशी त्यांच्या भूमिकेविषयी विचारले असता ते म्हणाले, “मी नकारात्मक छटा असलेल्या अनेक भूमिका रंगविल्या आहेत पण जतीन ही एक सकारात्मक, सशक्त भूमिका आहे. लहान बाळाच्या वडिलांची भूमिका साकारणे आव्हानात्मक आहे आणि ते योग्य साकारले गेले पाहिजे. जतीन हे मध्यवर्ती पात्र आहे, श्रॉफच्या प्रवेशाने कथेमध्ये नक्कीच बदल होणार आहेत. मी या नव्या प्रवासासाठी उत्सुक आहे आणि मला आशा आहे की माझे प्रेक्षक सुध्दा मला या सकारात्मक भूमिकेत स्वीकारतील.”

टॅग्स :उडान