सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. बॉलिवूडचा आघाडीचा फिल्ममेकर अनुराग कश्यपची लेक आलिया कश्यप ही लवकरच बोहल्यावर चढणार आहे. आलिया तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगॉयरसोबत लग्न करणार आहे. तिच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. अशामध्ये अनुराग कश्यपच्या होणाऱ्या जावयाबद्दल त्याच्या चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत.
सगळ्यांना एकच प्रश्न पडला आहे की ऐवढ्या मोठ्या दिग्दर्शकाची मुलगी आलिया कुणाशी लग्न करतेय? तिचा होणार नवरा कोण आहे? आलियाच्या होणारा नवऱ्याचा उत्पन्नाचा स्रोत काय आहे? अशाप्रकारचे अनेक प्रश्न सर्वांना पडले आहेत. तर आलियाचा होणार पती हा एक अमेरिकन बिझनेस मॅन आहे. त्याचं एक युट्यूब चॅनलदेखील आहे.
आलिया कश्यप आणि शेन गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. गेल्या वर्षी त्यांनी गुपचूप साखरपुडाही केला होता. बालीमधील त्यांचे प्रपोजल चांगलेच चर्चेत आलेले. आलिया २३ वर्षांची असून शेन ग्रेगोयर २४ वर्षांचा आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ११ डिसेंबरला मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.