Join us

ऑडिशनसाठी मंदिरातून चोरले होते पैसे, आज कोटींचे मालक, ओळखलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 15:59 IST

सलमान खान ते शाहरुखसोबत काम केलं असून ते बॉलिवूडच्या मोस्ट टॅलेंटेड अभिनेत्यांपैक एक आहे.

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर मोठे नाव कमावले आहे. बॉलिवूड जगतात स्वत:ला सिद्ध केलं आहे. असाच एक अभिनेते आहेत. ज्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये विविध पात्रांची भूमिका साकारली आहे. हीट चित्रपट दिले आहेत. सलमान खान ते शाहरुखसोबत काम केलं असून ते बॉलिवूडच्या मोस्ट टॅलेंटेड अभिनेत्यांपैक एक आहे. आज ते कोट्यवधींचे मालक आहेत. पण,  त्यांचं बालपण गरीबीत गेलं आहे.  एवढचं काय तर जेव्हा त्यांना ऑडिशन देण्यासाठी जायचं होतं. पण, त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. तेव्हा त्यांनी मंदिरात ठेवलेले पैसे चोरले होते. 

ते अभिनेते आहेत अनुपम खेर (Anupam Kher). अनुपम खेर हे चार दशकांहून अधिक काळ आपल्या कारकिर्दीत विविध भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. अनुपम यांना लहानपणापासूनच सिनेमांची आवड होती. काश्मिरमधून शिमलामध्ये विस्थापित झालेलं त्याचं कुटुंब होतं. शिमलामध्ये अनुपम यांचा जन्म झाला. वडील वन विभागात लिपिक होते आणि त्यांच्या तुटपुंज्या पगारात संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे त्यांच्यासाठी कठीण होते. एका खोलीच्या घरात १४ लोक एकत्र राहत होते.अनुपम खेर यांना अभिनयाची आवड होती आणि त्यांना त्यातच करिअर करायचं होते. कॉलेजच्या काळात अनुपम खेर यांनी चंदीगड विद्यापीठात थिएटर कोट्यासाठी अर्ज केला होता. यानंतर, अनुपम यांना ऑडिशनसाठी फोन आला पण त्यांच्याकडे चंदीगडला जाण्यासाठी पैसे नव्हते. 

संसद टीव्हीशी बोलताना अनुपम यांनी सांगितले की, "कोणत्याही किंमतीत चंदीगडला जाऊन ऑडिशन द्यायचं होतं. त्यासाठी मी घराच्या मंदिरात ठेवलेले शंभर रुपये गुपचूप काढले. माझी आई मंदिरात २५ पैशांची नाणी ठेवत असे आणि अशा प्रकारे तिथे १०८ रुपये जमा झाले होते. ज्यातून मी १०० रुपये काढले आणि उर्वरित परत ठेवले". यानंतर जेव्हा ते चंदीगडवरु परतले तर त्यांच्या घरी पोलिस आले होते. खरं तर त्यांच्या कुटुंबाने १०० रुपयांच्या चोरीची तक्रार पोलिसांकडे दाखल केली होती. यावेळी हिंमत करुन अनुपम यांनी त्याच्या वडिलांना ऑडिशनसाठी जाण्यासाठी मंदिरातून पैसे घेतल्याचं संपूर्ण सत्य सांगितलं. पण, त्यांचं हे कृत्य पाहून त्यांच्या आईन थेट कानशिलात लगावली. अनुपम यांनी आतापर्यंत ५०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर सुमारे ४५० कोटी रुपयांची मालमत्ता त्यांच्याकडे आहे. रिपोर्ट्सनुसार, अनुपम खेर यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे तीस कोटी रुपये आहे.

टॅग्स :अनुपम खेरबॉलिवूड