Join us

'दगडीचाळ 2' चा बोलबाला; डॅडी अन् सुर्याच्या वॉरचा पडद्यावर धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 14:03 IST

Daagdi chawl 2: चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ 2’ ला प्रेक्षकांनाकडून मिळणाऱ्या प्रेमासह समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

Daagdi Chawl 2:  अरुण गवळी हे नाव मुंबईत कोणालाही नवीन नाही. मुंबई गँगवॉरमधील सर्वात मोठं नाव म्हणजे ‘अरुण गवळी’ उर्फ ‘डॅडी’. अलिकडेच त्यांच्या ‘दगडी चाळी’वर आधारित असलेला ‘दगडी चाळ 2’ (Daagdi Chawl 2) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे ‘दगडी चाळ’ प्रमाणेच  ‘दगडी चाळ 2’ लाही प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सध्या गाजताना दिसतोय.

चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ 2’ ला प्रेक्षकांनाकडून मिळणाऱ्या प्रेमासह समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाची प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून प्रशंसा होत आहे. इतकंच नाही तर त्यातील गाणीही लोकप्रिय होताना दिसत आहेत.

 एकेकाळी  डॅडींचा राईट हॅण्ड असलेला सूर्या आज त्यांच्याच विरोधात का उभा आहे ह्याच कोड अखेर  प्रेक्षकांच्या समोर आलं आहे. सूर्या आणि डॅडींच्या आपुलकीच्या नात्यापेक्षाही जास्त त्यांच्या वैराला प्रेक्षकांनी जल्लोषात प्रतिसाद दिला आहे. सूर्या आणि डॅडींच्या वैरात शकीलने मारलेली धमाकेदार एन्ट्री मराठी पडद्यावरही धमाका करताना दिसत आहे.

सूर्या आणि सोनलच्या लव्हस्टोरीने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच प्रेमळ छाप सोडली आहे. तर त्यांच्या तरल प्रेमकहाणीच्या वेलीवर अंशुमन नावाचे ‘बटरफ्लाय’ म्हणजेच त्यांच्या मुलालाही प्रेक्षकांनी तेवढीच पसंती दाखवली आहे.चित्रपटात अंकुश चौधरी सूर्याच्या भूमिकेत, पूजा सावंत सोनलच्या भूमिकेत तसेच मकरंद देशपांडे हे  'डॅडींच्या' भूमिकेत असून 'शकील' च्या भूमिकेत अशोक समर्थ आहेत.  

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटीअंकुश चौधरीपूजा सावंत