Join us

अंकिता ट्रॉफी जिंकेल का? Bigg Boss Finale च्या सेटवर पोहोचताच सासूने काय उत्तर दिलं बघा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 17:52 IST

अंकिताच्या सासूचा व्हिडिओ व्हायरल

Bigg Boss 17 Finale: बहुचर्चित टेलिव्हिजन शो बिग बॉस 17 चा विजेता काही तासातच घोषित होणार आहे. या सिझनमध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैनची जोडी सर्वात जास्त चर्चेत होती. आधी दोघांची घरातील भांडणं आणि नंतर विकीच्या आईने अंकिताला मारलेले टोमणे यामुळे हे कुटुंब लाईमलाईटमध्ये आलं. अंकिताच्या सासूने माध्यमांशी बोलताना सूनेलाच बोल लावले. सासू-सूनेतील वाद नॅशनल टेलिव्हिजनवर आला होता. हे सर्व अडथळे पार करत आज अंकिताने फिनालेपर्यंत मजल मारली आहे. दरम्यान अंकिता विजेतेपद पटकावणार का या प्रश्नाचं उत्तर आता तिच्या सासूने दिलं आहे.

विकी जैन आणि अंकिता लोखंडे दोघांच्या आई नुकत्याच बिग बॉस फिनालेच्या सेटवर पोहोचल्या आहेत. यावेळी पापाराझींनी त्यांना सेटबाहेरच घेरलं आणि प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. माध्यमांनी अंकिताची सासू रंजना जैन (Rajni Jain)यांना विचारलं की, 'काय वाटतं कोण जिंकणार? अंकिता विजेतेपदाच्या जवळ आली आहे. काय सांगाल?' यावर रंजना जैन म्हणतात, "अंकिता नक्कीच जिंकेल...ट्रॉफी घेऊन घरी येईल."

अंकिताच्या सासूचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अंकिताचीच चेष्टा केली आहे. तसंच विकीच्या आईला माध्यमांपासून दूरच राहिलं पाहिजे म्हणत काही चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.

अंकिताची सासू फॅमिली वीकमध्ये बिग बॉसच्या घरात आली असता तिला काही गोष्टी ऐकून घ्याव्या लागल्या होत्या. 'विकीने अंकिताला सूट दिली आहे' असं रजनी जैन म्हणाल्या होत्या. तसंच अंकिताच्या वडिलांवरुनही त्यांनी टिप्पणी केली ज्यामुळे अंकिताला प्रचंड वाईट वाटलं होतं. सासू-सूनेमधील वाद चव्हाट्यावर आला होता. आता मात्र अंकिताच्या सासू सूनेला पाठिंबा देण्यासाठी पोहोचली आहे. रात्री 12 वाजता बिग बॉस 17 चा विजेता घोषित होणार आहे.

टॅग्स :अंकिता लोखंडेबिग बॉसपरिवार