Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंकिता लोखंडे प्रेग्नंट? 'त्या' व्हिडिओनंतर चर्चांना उधाण; लग्नानंतर 3 वर्षांनी गुडन्यूज देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 15:22 IST

लाफ्टर शेफ सेटवरुन व्हायरल झाला व्हिडिओ

'पवित्र रिश्ता' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)  चाहत्यांची लाडकी अभिनेत्री आहे. या मालिकेने अगदी तिला यशाच्या शिखरावर पोहोचवलं. मात्र वैयक्तिक आयुष्यात अंकिताला अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागलं. बिग बॉस 17 मुळे अंकिता पुन्हा प्रसिद्धीझोतात आली.  यामध्ये तिने पती विकी जैनसोबत घरात एन्ट्री घेतली होती. अंकिताने बिग बॉसमध्ये असतानाच आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता अंकिता खरंच प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या कलर्स टीव्हीवरील 'लाफ्टर शेफ' या रिएलिटी शोमध्ये दिसत आहे. यातही तिच्यासोबत विकी जैन आहे. तसंच टीव्हीवरील इतर काही लोकप्रिय कपल आणि कलाकारा आहेत. जसे की करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाश, अली गोनी-जास्मीन भसीन, कृष्णा अभिषेक-कश्मीरा शाह, राहुल वैद्य, निया शर्मासह आणखी काही कलाकारांचा समावेश आहे. लाफ्टर शेफचा एक बीटीएस व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यामध्ये अली गोनी हसतच विकीकडे बघून  'छोटा जैन आने वाला है' असं म्हणताना दिसतोय. यावर विकीही हसतोय.  या व्हिडिओनंतर अंकिताच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

2021 साली अंकिताने बिझनेसमन विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली. अगदी रॉयल अंदाजात तिचं लग्न पार पडलं. आता लग्नाच्या तीन वर्षांनी अंकिता गुडन्यूज देणार का याकडे चाहत्यांचं लक्ष आहे. सध्या अंकिता आणि विकी 'लाफ्टर शेफ' मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.

टॅग्स :अंकिता लोखंडेप्रेग्नंसीसोशल मीडियापरिवार