Join us

माधुरीच्या गाण्यावर थिरकली अंकिता लोखंडे, धक धक गर्ललाही पडली भुरळ; व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 14:20 IST

माधुरी दीक्षितबरोबर थिरकली अंकिता लोखंडे, व्हिडिओ पाहून नेटकरी करत आहेत कौतुक

'पवित्रा रिश्ता' मालिकेतून अभिनेत्री अंकिता लोखंडे प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेतील अर्चना या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. अभिनयाबरोबरच अंकिता तिच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडते. पण, सध्या मात्र ती तिच्या डान्समुळे चर्चेत आहे. उत्तम अभिनय करण्याबरोबरच अंकिता उत्कृष्ट डान्सरही आहे. अंकिताने धक धक गर्ल माधुरी दीक्षितला तिच्या वाढदिवसानिमित्त खास सरप्राइज दिलं आहे. 

'डान्स दिवाने'च्या मंचावर अंकिताने माधुरीसाठी तिच्या गाण्यांवर डान्स करत सरप्राइज दिलं. याचा व्हिडिओ कलर्सच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत अंकिताने माधुरीसारखा लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. "मै कोल्हापूर से आयी हूं" या गाण्यावर अंकिता थिरकताना दिसत आहे. तिचा स्पेशल परफॉर्मन्स पाहून माधुरीलाही डान्स करण्याचा मोह आवरता आलेला नाही. व्हिडिओत पुढे माधुरी अंकिताबरोबर थिरकल्याचं दिसत आहे. 

अंकिताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी अंकिताचं कौतुकही केलं आहे. "एक मराठी मुलगी दुसरीला ट्रिब्युट देत आहे", "माधुरी दीक्षितचं तरुणपणीचं व्हर्जन" अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. 

टॅग्स :अंकिता लोखंडेमाधुरी दिक्षितटिव्ही कलाकार